ICC Test Ranking: जसप्रीत बुमराह ठरला कसोटीतील नंबर 1 गोलंदाज, आर. अश्विन राहिला मागे
जसप्रीत बुमराह कसोटीत जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. सध्या त्याचे 881 गुण आहेत. बुमराहने इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.
Jasprit Bumrah No. 1 Test Bowler: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) इंग्लंडविरुद्धच्या उत्कृष्ट गोलंदाजीचा फायदा झाला आहे. आता जसप्रीत बुमराह कसोटीत जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. सध्या त्याचे 881 गुण आहेत. बुमराहने इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावातही बुमराहने 3 फलंदाजांना बाद केले होते. बुमराहला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल ठरणारा जगातील पहिला गोलंदाज आहे. (हे देखील वाचा: WTC Point Table Update: दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे भारताचे मोठे नुकसान, न्यूझीलंडने पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप)