Glenn Phillips Stunning Catch: हवेत उडत ग्लेन फिलिप्सने घेतला अशक्य झेल, 49 सेकंदाचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मार्नस लॅबुशेन त्याच्या शतकाकडे वाटचाल करत होता. दरम्यान, त्याने पॉइंट आणि थर्ड स्लिपमधील अंतर कापण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्लेन फिलिप्सने उजवीकडे हवेत सुपरमॅनप्रमाणे उडी मारली आणि अशक्य झेल एका हाताने शक्य करून दाखवला.

Glenn Phillips Stunning Catch: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे खेळवली जात आहे. आज शनिवारी या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मार्नस लॅबुशेन त्याच्या शतकाकडे वाटचाल करत होता. दरम्यान, त्याने पॉइंट आणि थर्ड स्लिपमधील अंतर कापण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्लेन फिलिप्सने उजवीकडे हवेत सुपरमॅनप्रमाणे उडी मारली आणि अशक्य झेल एका हाताने शक्य करून दाखवला. ग्लेन फिलिप्सची अशी चपळता पाहून मार्नस लॅबुशेनलाही आश्चर्य वाटले आणि त्याला शतक पूर्ण न करताच पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement