Brawl at Lalbaugcha Raja Video: मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळात स्वयंसेवक आणि भाविकांमध्ये भांडण; समोर आल्या हाणामारीच्या दोन घटना (Watch)
एका घटनेत एक महिला स्वयंसेवक महिला भक्ताला मारहाण करताना दिसत आहे. दुसऱ्या घटनेत पुरुष भक्त आणि गणपती मंडळाचे पदाधिकारी यांच्यात हाणामारी होत असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मात्र, मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही इथे अनिष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी लालबागच्या राजाचे भक्त आणि स्वयंसेवक यांच्यात भांडणाच्या दोन घटना घडल्या. एका घटनेत एक महिला स्वयंसेवक महिला भक्ताला मारहाण करताना दिसत आहे. दुसऱ्या घटनेत पुरुष भक्त आणि गणपती मंडळाचे पदाधिकारी यांच्यात हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (हेही वाचा: Lalbaugcha Raja Darshan Video: लालबागचा राजा गणपती दर्शनासाठी भक्तांच्या रांगा)
लालबागचा राजा मंडळामध्ये हाणामारी -
Advertisement
संबंधित बातम्या
Riteish Deshmukh चा 'राजा शिवाजी' सिनेमातील डांसर सहकलाकार सातारा मध्ये नदीपात्रात बुडला; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
Riteish Deshmukh च्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमा सोबत काम करण्याची संधी; डिझायनर्स, टायपोग्राफर्सना केलं आवाहन (Watch Video)
Ghibli Art Of Lord Ganesha: 'गणेश प्रतिमांचे घिबली आर्ट हा देवतांचा अवमान'; Mumbai Cha Raja Mandal ची सोशल मीडियावरून बाप्पाचे एआय जनरेटेड फोटो काढून टाकण्याची विनंती
Fire At Kamla Raja Hospital In Gwalior: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील कमला राजा रुग्णालयात आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement