Water Pipe Damage at Bandra: वांद्रे मशिदीजवळ पाण्याच्या पाईपलाईन फुटली; 'या' ठिकाणी पाणी पुरवठा ठप्प, दुरुस्तीचे काम सुरू, Watch Video
पाण्याचा प्रवाह एवढा होता की, रस्ता पाण्याखाली गेला होता आणि प्रवाशांना परिसर ओलांडताना अडचणीचा सामना करावा लागला.
Water Pipe Damage at Bandra: वांद्रे मशिदीजवळील एसव्ही रोडवरील मेट्रोच्या कामात गुरुवारी दुपारी 3.38 च्या सुमारास मुख्य पाण्याची लाईन खराब झाली. त्यामुळे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या भागात पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. प्रभाग कर्मचारी आणि पाणी विभाग परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असून गळती दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. महालक्ष्मी आणि वांद्रे स्टेशन परिसरातील रहिवाशांना या घटनेचा फटका बसला आहे. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिज्युअलमध्ये रस्त्यावर पाणी साचलेले दिसत आहे. पाण्याचा प्रवाह एवढा होता की, रस्ता पाण्याखाली गेला होता आणि प्रवाशांना परिसर ओलांडताना अडचणीचा सामना करावा लागला. (हेही वाचा - Pune: पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाला सेनापती बापटांचे नाव द्या; सुप्रिया सुळे यांची मागणी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)