Kupwara Encounter: दहशतवाद्यांचा एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; कुपवाडामध्ये सुरक्षा दलाकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा
गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती आणि या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत 5 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत.
Kupwara Encounter: कुपवाड्यातील जुमागंद भागात सुरक्षा दलांनी पाच विदेशी दहशतवाद्यांना ठार केले असून शोध मोहीम सुरू आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, कुपवाडा स्थित पोलिसांच्या विशेष तपास युनिट (SIU) पथकाने महसूल विभागाच्या अधिकार्यांसह, आतरबुग लालपोरा, दिवार लोलाब येथे दहशतवादी अल्मासच्या तीन मालमत्ता जप्त केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती आणि या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत 5 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत. (हेही वाचा - Manipur Violence: मणिपूरच्या इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार; जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला लावली आग)