Ahmedabad Shocker: क्रूरतेचा कळस! अहमदाबादमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल, शाळेला नोटीस जारी (Watch)

हा व्हिडिओ अहमदाबादच्या वाटवा भागातील माधव पब्लिक स्कूलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

Representative Image (Photo Credits: Pixabay)

शिक्षकाला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र शिक्षक या शब्दाला, पदाला कलंक लावणारी धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबादमधून समोर आली आहे. येथे एका शिक्षकाने एका निष्पाप विद्यार्थ्यावर अमानुष अत्याचार केला आहे. शिक्षकाने मुलाला बेदम मारहाण केली आहे. ही घटना वर्गात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अहमदाबादच्या वाटवा भागातील माधव पब्लिक स्कूलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. एवढ्या क्रूरतेने त्याचे समाधान झाले नाही तेव्हा त्याने त्या निष्पाप विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेला नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेकडून एका दिवसात खुलासा मागवला आहे. (हेही वाचा: Palghar Crime: पालघर येथील आश्रम शाळेतील खळबळजनक घटना; दोन लाडू का घेतले म्हणून शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल)

अहमदाबादमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण- 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement