'Jai Shree Ram': धुळ्याची 10 वर्षीय Vedika Jaiswal हुबेहूब रामलल्लासारखी वेशभूषा करून पोहोचली अयोध्येत; व्हिडीओ व्हायरल (Watch)

महाराष्ट्रातील धुळे येथून अयोध्येला पोहोचलेल्या वेदिका नावाच्या लहान मुलीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही दहा वर्षांची मुलगी हुबेहूब रामलल्लाची वेशभूषा करून देशभरातील भाविकांचे आकर्षण ठरली आहे.

Minor girl Vedika Jaiswal dressed as Lord Ram steals limelight in Ayodhya on the first anniversary of Pran Pratishtha ceremony. (Photo credits: Instagram/ani_trending)

भगवान रामाच्या अयोध्या नगरीत आज राम लल्ला प्राणप्रतिष्ठेचे पहिले वर्ष साजरे करण्यात येत आहे. या दिवसाचे औचित्य साधत आज अयोध्येत रामभक्तांना रांगा लागल्या आहेत. अशात महाराष्ट्रातील धुळे येथून अयोध्येला पोहोचलेल्या वेदिका नावाच्या लहान मुलीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही दहा वर्षांची मुलगी हुबेहूब रामलल्लाची वेशभूषा करून देशभरातील भाविकांचे आकर्षण ठरली आहे. वेदिका अयोध्येत आल्याबद्दल आनंदी आहे. यावेळी वेदिकाने, ‘राम नाम का गौरव जीता, सत्य सनातन सौरव जीता, जीत गयी घनघोर प्रतीक्षा, जीत गयी गीता की शिक्षा.. क्या जीता है अबकी बारी, काशी-मथुरा की है तैयारी', या कवितेमधून प्रभू रामाबद्दल आदर व्यक्त केला. (हेही वाचा: Laurene Powell To Visit Maha Kumbh 2025: ॲपलच्या मालकीण व स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल कुंभमेळ्यासाठी भारतात येणार; तब्बल 17 दिवस करणार कल्पवास)

Dhule Girl Dressed As Lord Ram- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Asian News International (@ani_trending)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now