Pune Coaching Class Scandal: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; दोन प्राध्यापकांवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, पुणे येथील घटना

पुणे येथील एका प्रसिद्ध कोचिंग क्लासमधील दोन प्राध्यापकांवर 17 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू असून दोन्ही आरोपी फरार आहेत.

Molestation | (Photo Credits: Archived, edited)

Pune Crime: पुणे येथील एका प्रसिद्ध कोचिंग संस्थेतील दोन प्राध्यापकांवर 17 वर्षीय मुलीचा छळ केल्याच्या आरोपाखाली लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान, संशयित दोन्ही आरोपी फरार असल्याचे समजते. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत नव्याने चिंता निर्माण झाली आहे.

प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींचा हात

शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता 12 वीच्या वर्गात शिकते. तिने गुरुवारी रात्री उशिरा दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही घटना उघडकीस आली. आरोपी, प्राध्यापक विजय पवार - बीडच्या कोचिंग उद्योगातील एक प्रभावशाली व्यक्ती - आणि प्राध्यापक प्रशांत खटावकर यांनी अनेक महिने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, Minor Girl Raped in Mumbai: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती; 17 वर्षीय मुलावर POCSO कायद्याखाली गुन्हा दाखल)

तक्रार करण्यासाठी गेल्यावरही गैरवर्तन

पीडितेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक खटावकर यांनी तीस जुलै 2024 मध्ये आपल्या दालनात बोलावले आणि तिच्यासोबत अनुचित वर्तन केले. प्राध्यापकाने केलेल्या वर्तनाची तक्रार करण्यासाठी तिने तिने संस्थेच्या संचालकांशी संपर्क साधला तेव्हा तिने आरोप केला की, त्यांनीही असेच गैरवर्तन केले. मे 2025 पर्यंत ही छेडछाड सुरू राहिली. (हेही वाचा, Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल)

तक्रार प्राप्त, गुन्हा दाखल, तपास सुरु- पोलीस

सहाय्यक निरीक्षक अतुल कुमार लांडगे यांनी पुष्टी केली की, पीडितेची तक्रार प्राप्त झाली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक त्यांना पकडण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत, असे लांडगे म्हणाले.

नागरिकांमध्ये संताप

नामांकित कोचींग क्लासेसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ज्यामुळे संपूर्ण प्रदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये कडक सुरक्षेची मागणी तीव्र झाली आहे. हे प्रकरण कोचिंग सेंटरमधील तरुणींच्या सुरक्षेबद्दलच्या सततच्या चिंतांवर प्रकाश टाकते, विशेषतः महाराष्ट्रात महिला सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये सुधारणा करण्याच्या अलिकडच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर. दरम्यान, पोलिस तपास सुरू आहे आणि अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की आरोपींना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.

अन्याय अत्याचाराविरोधा माहिती आणि मदत

महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सेवा उपलब्ध असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. स्वत:बद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे आणि मदत मिळविणे यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा:

महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:

चाइल्डलाइन इंडिया: 1098; हरवलेली मुले आणि महिला: 1094; महिला हेल्पलाइन: 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग: 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन: 7827170170; महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोलीस हेल्पलाइन: 1091/1291.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement