Nagpur Cyber Fraud: पुरूष वेश्या बनण्यासाठी पत्नीचे दागिने ठेवले गहाण; 5 लाखांची झाली फसवणूक

याबाबतच्या अनेक तक्रारी देशभरात विविध ठिकाणी नोंंदवल्या जात आहेत.

Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नागपूर (Nagpur) मध्ये आर्थिक विवंचनेत असलेल्या मध्यमवयीन व्यक्तीला पुरूष वेश्या (Gigolo) बनवत श्रीमंत करण्याचं स्वप्न दाखवत आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये त्याची 5 लाखांची फसवणूक झाली आहे. श्रीमंत महिलांना शारिरीक सुख देण्याच्या बदल्यात त्याला मोठी रक्कम ऑफर करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी त्याला कंस्टक्शन साईट वर मजूर म्हणून काम करताना 4 च्या सुमारास फोन आला होता.

 

अंकिता नावाच्या मुलीने फोन केला होता. तिने आपण Lover World Marvelous Security Services, म्हणून बोलत असल्याचं सांगितलं. लखपती बनायचं असेल तर 'पुरूष वेश्या' बनावं लागेल असं तिने सांगितलं. 42 वर्षीय दोन मुलांचा बाप असलेला तो व्यक्ती यासाठी तयार झाला त्याने पत्नीचे दागिनेही गहाण ठेवले. विविध सेवा देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारे त्याला कॉल करत होते. अंकिताने जे पैसे मिळतील त्यापैकी 30% कमिशन आणि उरलेले 70% त्याच्याकडे ठेवायला सांगितले. नक्की वाचा: Cyber Fraud in India: गेल्या वर्षी सायबर फसवणुकीमुळे भारतीयांचे 7,488.6 कोटी रुपयांचे नुकसान; यादीत महाराष्ट्र अव्वल .

अंकिताच्या जाळ्यात अडकलेल्या त्याने QR code द्वारा 850 रूपये रजिस्ट्रेशन म्हणून दिले. त्यानंतर अप्रुव्हल लेटर, मेडिकल चेकअप, लायसंस फी अशा विविध बहाण्याने पैसे उकळण्यासाठी ती फोन करत होती. एका टप्प्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचं समजलं त्याने 1930 वर सायबर क्राईम मध्ये मदत करणार्‍या पोलिसांची मदत मागितली.

देशभरामध्ये सध्या अशाप्रकारे तरूणांना पैशांचं आमिष दाखवून प्ले बॉय किंवा पुरूष वेश्या म्हणून बनवलं जाण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी देशभरात विविध ठिकाणी नोंंदवल्या जात आहेत.