Mumbai Water Supply: वांद्रे, खार येथे आज सलग दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठ्यावर परिणाम
पाण्याच्या पुरवण्यावर सोमवारी (22 नोव्हेंबर) सुद्धा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
Mumbai Water Supply: मुंबईतील वांद्रे, खार आणि सांताक्रुज येथे आज सलग दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पाण्याच्या पुरवण्यावर सोमवारी (22 नोव्हेंबर) सुद्धा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले होते. कारण माहीम खाडी येथील तानसा ईस्टची 1800mm च्या मुख्य लाईनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले.(Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी सरपंचावर मोठी जबाबदारी, 100 टक्के लसीकरण झालेल्या पहिल्या 25 गावांना देणार निधी)
हायड्रॉलिक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, आम्ही पूर्णपणे काम केले आहे. परंतु नंतर कळले लीकेज अद्याप पूर्णपणे भरलेले नाही. त्यामुळेच रविवारी सुद्धा कमी दाबाने पाण्याचा पुरवठा केला जात होता. आज सुद्धा पुन्हा लीकेज संबंधित काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पाली हिल असोसिएशन येथे राहणाऱ्या मधू पोपलाई यांनी तक्रार करत असे म्हटले की, काही सोसायट्यांना पाण्याचे टँकर्स मागवावे लागत आहेत. परंतु त्यासाठी सुद्धा अधिक पैसे द्यावे लागतायत. काही जणांनी एका टँकरसाठी 7 हजार रुपये घेऊ असे सांगितले. या व्यतिरिक्त टँकर येण्यासाठी सात तास वाट पहावी लागल्याचे ही मधू यांनी असे म्हटले.(Mumbai Local Update: मुंबई मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर 22 नोव्हेंबर पासून धावणार 6 नव्या एसी लोकल)
माहीम खाडी येथे तानसा पूर्व आणि तानसा पश्चिम येथे दोन मुख्य लाइन्स असल्याचे वांद्रे नगरसेवक आसिफ झाकिरा यांनी सांगितले. या जलवाहिन्या खुप जुन्या झाल्या असून त्या कोऱ्या पडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने ही समस्या सोडवून नागरिकांना दिलासा पाहिजे. असे खारच्या नगरसेवक स्वप्ना म्हात्रे यांनी म्हटले.