Mumbai: चेंबूर येथे 20 वर्षीय मुलीला रॉडचा धाक दाखवत बलात्कार, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
या आरोपीने 20 वर्षीय मुलीला रॉडचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या वेळेस घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Mumbai: मुंबई पोलिसांनी एका 24 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीने 20 वर्षीय मुलीला रॉडचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या वेळेस घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धीरज सिंग असे आरोपीचे नाव असून तो विविध नोकऱ्या करतो. त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.(Nashik Shocker: अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाकडून बलात्कार; दोघजण अटकेत)
पोलिसांनी या प्रकरणी माहिती देत असे म्हटले की, पीडिता ही तिच्या मैत्रीणीसोबत शुक्रवारी रात्री मरिन ड्राइव्ह येथे फिरण्यासाठी गेली होती. त्यानंतर रात्री 3 वाजता ती तिच्या येथील एकासोबत परतली. आरोपी सु्द्धा तिच्याच परिसरात राहत असून तो पीडितेला ओळखतो. आरोपी एका गल्लीच्या येथे लोखंडाचा रॉड घेऊन उभा होता. त्या दोघांना पाहता त्याने रॉडला धाक दाखवला. घाबरलेल्या त्या मुलीच्या मित्राने तिला तेथेच एकटीला सोडून पळ काढला. त्यानंतर आरोपीने मुलीला रॉडचा धाक दाखवत दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात तेथे तिच्यावर बलात्कार केला.
घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला. या सर्व प्रकारानंतर पीडितीने पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपी सिंग याला अटक करण्यासाठी दोन स्पेशल टीम कामाला लावल्याचे पोलिसांनी म्हटले. तर त्याला अटक केल्यानंतर रविवारी कोर्टात हजर केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.(Nagpur Sexual Abuse Case: नागपूर येथील महिलेवर सलग 5 वर्षे लैंगिक अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर युट्युबवर पाहून गर्भपात; एकास अटक)
चेंबूर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जयकुमार सुर्यवंशी यांनी असे म्हटले की, पीडितेला वैद्यकिय चाचणीसाठी पाठवण्यात आले. आमचा तपास सुरु आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फूटेज सुद्धा तपासून पाहिले जात आहेत. महिला पोलीस अधिकारी मनिषा शिर्के या प्रकरणाचा तपास करत आहेत.
असे दिसून आले आहे की, आरोपी हा विवाहित असून त्याच्या बायकोसोबत राहतो. तर आरोपीच्या विरोधात याआधी सुद्धा कोणती तक्रार दाखल करण्यात आल्याचे ही तपासले जात आहे. आरोपी दारु प्यायल्याचे समोर आले आहे. तर त्याची वैद्यकिय चाचणी आणि रक्ताचे रिपोर्ट्सची वाट पाहिली जात आहे. आरोपीच्या विरोधात कलम 376,504,506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.