Nashik Shocker: अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाकडून बलात्कार; दोघजण अटकेत
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

नाशिक (Nashik) मधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. एका अल्पवयीन मुलाने (Minor Boy) अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, डोंबिवली मधील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असताना राज्याच्या विविध भागातून बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहेत.

नाशिक मधील सिन्नर येथे राहणारा सचिन सोमनाथ म्हस्के हा 22 वर्षीय तरुण एका अल्पवयीन मुलीचा दोन वर्षांपासून पाठलाग करत होता. त्याने तिला एकांतात बोलवून त्याचे म्हणणे ऐकले नाही म्हणून धमाकवले होते. त्याने पीडितेची ओळख एका अल्पवयीन मुलासोबत करुन दिली. या अल्पवयीन मुलाने 6 सप्टेंबर रोजी पीडितेला कॅफेमध्ये भेटायला बोलावले. तिथे मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्याचबरोबर याबद्दल कोणाला सांगितल्या जीवे मारण्याची धमकी दिली. सचिनला या घटनेची माहिती मिळताच त्याने देखील मुलीकडे शरीर सुखाची मागणी करत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यानंतर मुलीने या सर्व प्रकाराबद्दल आपल्या पालकांना सांगितले.

पीडितेच्या वडीलांना सिन्नर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सचिनला अटक केली. तर दुसऱ्या अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. (Bhayandar Rape Case: भाईंदर मध्ये 22 वर्षीय तरूणाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक)

सध्या राज्यात डोंबिवली येथील सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर कल्याण येथे ट्युशन टिचर कडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. भाईंदर येथील रेप केस, त्यानंतर आता नाशिकमधील हे प्रकरण यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.