Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Karnataka Shocker: कर्नाटकमधील बेळगाव(Belagav) येथे एका महिलेने पतीची हत्या (Killing Husband) केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने दारूच्या नशेत असलेल्या पतीची आधी गळा आवळून हत्या केली. त्यानंतर चेहरा दगडाने ठेचला आणि मृतदेहाचे तुकडे (Chops Body into Pieces) केले. या घटनेनंतर गुरुवारी पोलिसांनी महिलेला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. सावित्री इटनाली असे आरोपी महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने मृत पतीच्या शरीराचे दोन तुकडे केले आणि ते घरापासून दूर फेकले. पोलीसांना 10 डिसेंबर रोजी बेळगावच्या चिक्कोडी तालुक्यातील उमराणी गावात 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. श्रीमंथा इटनाली असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मृतदेहाचे अवयव सापडले होते. (Mumbai Shocker: मोठ्या बहिनीला जास्त प्रेम करते म्हणत लहान मुलीने केली आईची हत्या, पोलिसांनी केली अटक)

पतीच्या मृत्यूनंतर पोलिसांना पत्नीवर सर्वात आधी संषय आला. तिची इलट तपासणी केली असता तिने गुन्ह्याची कबूली दिली. सावित्रीने 8 डिसेंबर रोजी पतीची हत्या केल्याचे कबूल केले. दारूच्या नशेत असलेला पती पैशासाठी तिचा अनेकदा छळ करत असे, असे तिने पोलिसांनी सांगितले. खुनाच्या दिवशी तो जमिनीचा हिस्सा हवा म्हणून पत्नीशी भांडत होता.

सावित्रीने जमीन विकून नवीन गाडी घ्यावी अशी त्याची इच्छा होती. त्या रात्री तो बाहेर झोपला असताना तिने त्याची हत्या केल्याची कबुली दिली.