गोवर रुबेला लस दिल्याने नपुंसकत्त्व? गैरसमजातून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, कौसा येथील नागरिकांत संभ्रम, लसीकरणास विरोध
त्यासाठी या मोहिमेंतर्गत तब्बल ३.३८ कोटी बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या मोहिमेचे उद्दीष्ट सफल झाले तर राज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना या लसीकरणाचा लाभ होणार आहे.
गोवर रुबेला लसीकरण (Measles-Rubella Vaccination )मोहिमेच्या पहिल्याच दिवशी आरोग्य विभागाला ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुंब्रा(Mumbra), कौसा (Kausa)परिसरातील नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. गोवर रुबेला आजाराबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने जोरदार जनगृती आणि प्रबोधन केले होते. मात्र, तरीही लस टोचल्याने नपुंसकत्व येत असल्याच्या समजूतीवर नागरिक ठाम आहेत. त्यामुळे या परिसरात केवळ १३ टक्के इतकेच लसीकरण झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. त्यामुळे या लसीकरणापूर्वी परिसरातील मुलांच्या पालकांना अंधश्रद्धा आणि गैरसमजाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे मोठेच आव्हान आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे.
गोवर रुबेरा (Measles-Rubella) आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी या मोहिमेंतर्गत तब्बल ३.३८ कोटी बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की, आरोग्य विभागाच्या मोहिमेचे उद्दीष्ट सफल झाले तर राज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना या लसीकरणाचा लाभ होणार आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच, ती नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालके आणि मुलांना देण्यात येणार आहे. मात्र, असे असले तरी, समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरा, अंधश्रद्धा आदींचा विळखा लोकांच्या मनात आजही असल्यामुळे सरकाच्या स्वप्नांना खिळ बसत आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, कौसा मुंब्रा परिसरात लसीकरण मोहीम सुरु झाल्यापासूनच टीकेची धनी ठरली आहे. त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मुलांना लसीकरणाचा लाभ देण्याऐवजी त्यापासून वंचित ठेवण्याकडेच कल ठेवला आहे. परिणामी ठाणे महापालिकेकडील आकडेवारीनुसार मुंब्रा, कौसा परिसारातील लोकांमध्ये इतर विभागांच्या तुलनेत नगण्य म्हणावे इतके लसीकरण झाले आहे. ठाणे महापालेकेने २२ शाळांमध्ये लसीकरण मोहिम सुरु केली होती. या शाळांमधून सरासरी ८० टक्के लसीकरण झाल्याची नोंद झाली. त्या तुलनेत मुंब्रा, कवसा परिसरात मात्र केवळ सरासरी पाच टक्के इतकीच नोंदणी झाल्याचे पुढे आले. (हेही वाचा, गोवर - रुबेला लसीकरणनंतर वर्धा जिल्ह्यात 3 मुलींना रिअॅक्शन)
दरम्यान, नागरिकांच्या डोक्यातून गैरसमज, अंधश्रद्धा आणि संभ्रमाचे भूत बाहेर काढण्यासाठी आरोग्य विभाग अनेक प्रकारे काम करत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने परिसारात १०० हून अधिक पोस्टर्स लावले आहेत. तसेच, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक धर्मगुरूंचीही मदत घेतली जात आहे. असे असले तरी पालकांचा विरोध काही कमी होताना दिसत नाही. ही लस टोचल्याने मुलांना भविष्यात नपुसकत्त्वाचा समान करावा लागतो ही अनाठाई भीती नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे शाळांमधून लसीकरण उपक्रम राबविला तर त्यालाही आपण विरोध करु असे येथील पालक म्हणत आहेत.
पालकांचा टोकाचा विरोधा पाहून शाळांनीही एक पाऊल मागे घेतले आहे. सरकारच्या लसीकरण मोहिमेस (Measles-Rubella Vaccination campaign)पाठिंबा दिला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना लसीकरण करायचे असल्यास पालकांकडून परवानगी पत्र मागितले आहे. त्यातच लसीकरणाबाबत कोणतीही जबाबदारी शाळा प्रशासन घेणार नसल्याचा उल्लेख या पत्रात असल्याने नागरिकांच्या भीतीत अधिकच भर पडली आहे. दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या लसीकरणासाठी पालकांना परवागी पत्र मागणेच मुळात गैर असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. मुंब्रा, कौसा परिसरातील ४४ शाळांनी या लसीकरणाला विरोध दर्शवला आहे. त्यापैकी २५ शाळा तर उर्वरीत १९ नर्सरी आहेत.