Maharashtra Political Crisis: घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तिसऱ्या दिवशी कायद्याचा किस, युक्तिवाद संपला, पुढे काय? घ्या जाणून

दन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करत कायद्याचा किस पाढण्यात आला. घटनापिठाने दोन्ही बाजू ऐकूण घेतल्या मात्र कोर्टाने निर्णय मात्र कोणताच दिला नाही. कोर्टाने आजच्या सुनावणीनंतर निर्णय राखून ठेवला.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात घनापीठासमोर सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. दन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करत कायद्याचा किस पाढण्यात आला. घटनापिठाने दोन्ही बाजू ऐकूण घेतल्या मात्र कोर्टाने निर्णय मात्र कोणताच दिला नाही. कोर्टाने आजच्या सुनावणीनंतर निर्णय राखून ठेवला. आजसह पाठिमागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सुनावणीमध्ये एकचमुद्दा चर्चेचा होता. तो म्हणजे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला नबाम रेबिया प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू ठरणार का? या मुद्द्याची तड लावण्यासाठी हे प्रकरण पाच न्यायधीशांच्या खंडपीठाने हाताळावे की हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करावे.

न्यायालयाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकूण घेतल्या आहेत. त्यानंतर न्यायालय आपला निर्णय कधी देते याबाब उत्सुकता आहे. एकदा का या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायाधीशांनी करायची की सात न्यायाधिशांच्या खंडपीठाने करायची याबाबत निर्णय झाला की मग पुढील सुनावण्यांना गती येणार आहे. राज्यापालांचे अधिकार, विधानसभा अध्यक्ष्य (उपाध्यक्ष) यांचे अधिका, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा , आमदारांचे निलंबन, यांसारक्या अनेक गोष्टी चर्चेत येणार आहेत. मुळ विषयांवर सुनावणी अद्यापही बाकीच आहे. त्यामुळे आज झालेल्या सुनावणीनंतर कोर्ट काय निर्णय देते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष; कोर्ट दुसऱ्या दिवशीही निर्णयाप्रत नाही, आज काय घडलं कोर्टात?)

उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपील सिब्बल ( Kapil Sibal), अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Singhvi) यांनी बाजू मांडली. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षाकडून जेष्ठ वकील हरीश साळवे ( Harish Salve) हे ऑनलाईन पद्धतीने सुनावणीला उपस्थित होते.