अकोला लोकसभा मतदारसंघ: प्रकाश आंबेडकर यांच्या रुपात वंचित मारणार बाजी की, काँग्रेसला हात दाखवत फुलणार भाजपचे कमळ?
2014 मध्ये काँग्रेस विरोधी लाटही जोमात होती. त्यातच भाजपने पुढे आणलेल्या नरेंद्र मोदी यांच्या फर्ड्या वक्तृत्वावर मतदारांनी फिदा होत काँग्रेसला देशातच चारीमुंड्या चीत केले. अकोला मतदारसंघातूनही काही वेगळे घडले नाही. इथे भाजपचा उमेदवारच मताधिक्याने निवडूण आला. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.
Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019 साठी आज घडीला महाराष्ट्रात जे काही प्रमुख आणि लक्षवेधी लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात अकोला लोकसभा मतदारसंघ येतो. प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे होम ग्राऊंड म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघ (Akola Lok Sabha Constituency). या मतदारसंघातून VBH कडून अॅड. प्रकाश आंबेडकर विद्यमान खासदार आणि भाजप ( BJP) उमेदवार संजय धोत्रे (Sanjay Dhotre), हिदायत पटेल (Hidayat Patel) हे काँग्रेस (Congress) पक्षाकडून प्रामुख्याने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्थात, प्रकाश आंबेडकर हे दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनही त्यांनी अर्ज दाखल केला आहे. तेथे त्यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासोबत आहे. प्रकाश आंबेडकर हे बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख नेते मैदानात असल्यामुळे अकोला मतदारसंघ राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्याही उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात अकोल्यासह प्रामुख्याने आठ शहरं येतात. या आठ शहरांचा कौल मतदारसंघातील विजयाचा गुलाल ठरविण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. लोकसभा निवडणूक 2014 चा इतिहास पाहता बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी ही शहरे वगळता इतर पाच शहरं ही भाजपच्या पाठिमागे उभी राहिली. या शहरांतून भाजपला जोरदार मतदान झाले. परिणामी भाजप उमेदवार संजय धोत्रे हे मतदारसंघातील इतर उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यात यशस्वी झाले. अर्थात त्यासाठी 2014 मध्ये काँग्रेस विरोधी लाटही जोमात होती. त्यातच भाजपने पुढे आणलेल्या नरेंद्र मोदी यांच्या फर्ड्या वक्तृत्वावर मतदारांनी फिदा होत काँग्रेसला देशातच चारीमुंड्या चीत केले. अकोला मतदारसंघातूनही काही वेगळे घडले नाही. इथे भाजपचा उमेदवारच मताधिक्याने निवडूण आला. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.
लोकसभा निवडणूक 2014 मध्ये प्रमुख उमेदवारांना मिळालेले मतदान
(आकडेवारीत बदल शक्य)
बदलत्या परिस्थितीनुसार 2014 मध्ये असलेली काँग्रेस विरोधी लाट बरीच निवळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्माही 2014 सारखा भासत नाही. अशा स्थितीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात एक वेगळा प्रयोग राबवला आहे. गेली अनेक वर्षे सत्तेत सहभागी असलेला विशिष्ट समाज, प्रस्थापित राज्यकर्ते आणि राजकीय पक्षांना आव्हान देत बहुजन वर्ग (जो गेली अनेक वर्षे सत्तेच्या प्रवाहातून बाहेर आहे) सोबत घेऊन राजकारण रेटण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांना आव्हान देणारा एक नवा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी जोरदार चर्चेत आहे. अशा या आघाडीचे प्रमुख अकोला मतदारसंघातून लढत आहेत. त्यामुळे हा सामना पुर्वीसारखा केवळ एक निवडणूक म्हणून नव्हे तर, थेट प्रतिष्ठेची लढाई असाच झाला आहे. (हेही वाचा, बुलढाणा लोकसभा मतदारसंघ: शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार, VBA ठरणार किंगमेगर)
अकोल लोकसभा मतदारसंघ खासदार 1991 ते 2019
दरम्यान, काँग्रेस, भाजप असो की वंचित बहुजन आघाडी सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या मतदारसंघात जोर लावला आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा प्रामुख्याने सामना रंगला असला तरी, अपक्ष उमेदवार आणि स्थानिक अघाड्यंची भूमिकाही या मतदारसंघात मोठी महत्त्वाची राहणारआहे. प्रबळ नसेल तर, अपक्ष उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता कमी असते. मात्र, निवडूण येणाऱ्या संभाव्य उमेदवारांच्या मतांमध्ये विभागणी केल्यामुळे एखादात ताकदवान उमेदवार मताधिक्य घटल्याने दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरही फेकला जाऊ शकतो. या सर्व शक्यतांचा विचार करता अकोला मतदारसंघातील लढत जबरदस्त असणार यात शंकाच नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)