नागपुर येथे वाढत्या COVID19 च्या प्रादुर्भावामुळे जनता कर्फ्यू लागू, अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार
या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधांसाठी परवानगी देण्यात आली आहे
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत चालल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. परंतु कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथे कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान आता नागपुर (Nagpur) मध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधांसाठी परवानगी देण्यात आली आहे.(विरार: दीड लाखाचे बिल ऐकून एका कोरोनाबाधित रुग्णाचे रुग्णालयातून पलायन)
नागपुर मध्ये महापालिका अधिकाऱ्यांना शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्याचे निर्देशन दिले आहेत. या वेळी फक्त अत्यावश्यक सेवासुविधाच सुरु राहणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. नागपुर शहरात आतापर्यंत कोरोनासंक्रमितांचा आकडा 2022 वर पोहचला असून 21 जणांचा बळी गेला आहे. तसेच 1366 जणांची प्रकृती सुधारली आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना बाधित रुग्ण आहेत याची आजची सविस्तर आकडेवारी पहा)
दरम्यान, काल 25 जुलै पर्यंत देशात एकूण 3 लाख 66 हजार 368 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 9 हजार 251 नवे कोरोनाबाधित रुग्ण हे कालच्या दिवसातील आहेत. यासोबतच कालच्या 257 जणांच्या मृत्यूसह आजवर देशात इतके मृत्यू झाले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 481 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 2 लाख 7 लाख 194 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणजेच मुंबईत सुद्धा काल 1090 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मुंबई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 07 हजार 981 इतकी झाली आहे.