Amazon, Flipkart App मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी नाहीतर दिवाळीचा सण MNS स्टाइलने साजरा केला जाण्याचा इशारा

ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) यांनी त्यांच्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी तयार केलेल्या अॅपमध्ये मराठी भाषेचा (Marathi Language) समावेश करावा अशी मागणी आता मनसे (MNS) कडून केली जात आहे.

MNS President Raj Thackeray | (File Image)

ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) यांनी त्यांच्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी तयार केलेल्या अॅपमध्ये मराठी भाषेचा (Marathi Language) समावेश करावा अशी मागणी आता मनसे (MNS) कडून केली जात आहे. याच कारणास्तव आज मनसेकडून या दोन्ही कंपन्यांच्या कार्यालयावर धडक दिली. मुंबईतील बीकेसी येथील ऑफिसवर जात मनसेकडून आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला गेला आहे. ऐवढेच नाही तर मागणी पूर्ण न झाल्यास दिवाळीचा सण मनसे स्टाइलने साजरा केला जाण्याचा इशारा मात्र मनसेकडून दिला गेला आहे.(Amazon Great Indian Festival Sale 2020 मध्ये रेडमी आणि वनप्लस च्या 'या' स्मार्टफोन्स आकर्षक ऑफर्स; पहा किती आहे डिस्काऊंट)

TV9 मराठीने दिलेल्या बातमीनुसार, मनसे नेते अखिल चित्रे यांनी आज फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या कार्यालवर आज धडक दिली. तेथे त्यांनी या दोन्ही ई-बेवसाईटच्या कर्मचाऱ्यांना सुनावले ही आहे. ऐवढेच नाही तर सात दिवसाच्या आतमध्ये ही मागणी पूर्ण करावी असे सुद्धा त्यांना सांगण्यात आले आहे. पुढे असे ही म्हटले की, ज्या पद्धतीने दक्षिण भारतामधील भाषांना प्राधान्य देत त्यांचा समावेश अॅप मध्ये केला आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेचा सुद्धा त्यामध्ये समावेश करण्यात यावा.(Flipkart Big Billion Days Sale 2020: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल मध्ये Realme च्या 'या' जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळणार भन्नाट सूट)

दरम्यान, देशभरात विविध सणउत्सवाचे दिवस सुरु होत असल्याने ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर सेलची सुरुवात होणार आहे. या सेलदरम्यान ग्राहकांना हजारोंच्या संख्येने असलेल्या प्रोडक्ट्सवर ऑफर्स आणि विशेष सूट ही दिली जाणार आहे. मात्र या दोन्ही वेबसाईट्सच्या प्राइम मेंबर्ससाठी सेल सुरु होण्याच्या एक दिवस आधी त्यांना सेलचा लाभ घेता येणार आहे. तर प्रत्येक सणासुदीला फ्लिपकार्ट आणि अॅमझॉनवर असलेल्या सेलमध्ये हजारोंच्या संख्येने ग्राहक खरेदी करत असल्याचे दिसून येते.