या '5' कारणांमुळे ठेवले जातात अनैतिक संबंध !

अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये राहूनही एखाद्या व्यक्ती पार्टनर सोडून दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षिक का होते? दुसरीकडे अफेअर करण्याची गरज त्यांना का भासते?

विवाहबाह्य संबंध (Photo Credit- Pixabay)

कोणत्याही नात्यात प्रेम आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचा. नाते हे त्यावरच आधारलेले असते, हे आपण सगळेच जाणतो.  पण अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये असूनही नात्यात खूश नसणारी अनेक कपल्स असतात. अलिकडेच विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.पण अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये राहूनही एखादी व्यक्ती पार्टनर सोडून दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षिक का होते? दुसरीकडे अफेअर करण्याची गरज त्यांना का भासते?   अशी मानसिकता होण्यामागे असतात ही 5 कारणे... व्याभिचार: विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून कलम ४९७ रद्द

भूतकाळ

मनाविरुद्ध लग्न केल्यास साथीदारासोबत जुळवून घेणे किंवा त्यावर प्रेम करणे अनेकदा कठीण होते. कारण पहिले प्रेम विसरणे जड जाते आणि मन पुन्हा पुन्हा पहिल्या प्रेमाकडे झुकते.

वैवाहीक जीवनात खूश नसल्यास

साथीदाराकडून प्रेम आणि वेळ मिळत नसल्याच वैवाहीत नाते अरसिक होते. अशावेळी जर दुसरं कोणीतरी वेळ, अटेंशन देऊ लागतो/लागते तेव्हा मन स्वाभाविकपणे त्या व्यक्तीकडे आकर्षित होते. परिणामी अनैतिक संबंधांना सुरुवात होते.

भावनिक एकटेपणा

नाते घट्ट होण्यासाठी तुम्ही भावनिकदृष्ट्या एकमेकांशी बांधलेले असणे गरजेचे आहे. भावनिकरित्या तुम्ही जितके एकमेकांजवळ असाल तितके तुमचे बॉण्डींग स्ट्राँग होईल. पण नात्यात भावनिक एकटेपणा वाटत असल्यास नात्याचा उबक येऊ लागतो आणि भावनिक आधारासाठी दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जातो.  ...म्हणून मुलं विवाहीत महिलांकडे अधिक आकर्षित होतात !

बदला

अनेकदा पार्टनरकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अफेअर केले जाते. पार्टनरकडून झालेला अनादर, दबाव या सगळ्याचे सडतोड उत्तर देण्यासाठी अफेअरचा पर्याय निवडला जातो.

गरज

जेव्हा पार्टनर मानसिक, शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण करु शकत नाही किंवा वारंवार समजवूनही त्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा बाहेर अफेअर करण्याची प्रवृत्ती बळावते.



संबंधित बातम्या