प्रतिकात्मक फोटो (File Photo)

आजकालच्या मुलांना विवाहीत महिलांबद्दल आकर्षण वाटू लागले आहे, हे एका संशोधनातून समोर आले आहे. पण यामागे नेमके काय कारण असू शकते? समाजाच्या दृष्टीने हे चुकीचे असले तरी त्यामागे नेमकी काय कारणं असतात, ते जाणून घेणे गरजेचे आहे. तर ही आहेत त्यामागील महत्त्वाची कारणे... व्याभिचार: विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून कलम ४९७ रद्द

आत्मविश्वास

सिंगल मुलींच्या तुलनेत लग्न झालेल्या स्त्रिया अधिक आत्मविश्वासू असतात. त्यांचा हाच आत्मविश्वास मुलांना त्यांच्याकडे आकर्षित करतो. विवाहीत महिला प्रत्येक समस्या अगदी नीट, व्यवस्थित सोडवू शकेल, असे त्यांना वाटत असते.

केअरिंग पार्टनर

विवाहीत महिला या सिंगल मुलींच्या तुलनेत अधिक काळजी घेणाऱ्या असतात. लग्नानंतर त्यांचे काळजी घेण्याचा स्वभाव अधिक खुलतो. विवाहीत महिलांचा हाच केअरिंग अॅडीड्युड मुलांना अधिक भावतो.

हार्मोन्समध्ये बदल

लग्नानंतर महिलांमध्ये हॉर्मोनल बदल होतात. त्यामुळे त्यांचे सौंदर्यही अधिक खुलते. मुलांना आकर्षित होण्यासाठी हे इतके कारण पुरेसे आहे.

हसरा स्वभाव

विवाहीत महिला घर, संसार, ऑफिस सर्व काही व्यवस्थित सांभाळतात. त्याचबरोबर या सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असते. विवाहीत महिलांची ही गोष्ट मुलांना आकर्षित करते.