आता लघवीचा रंग आणि वासावरून ओळखा कसे आहे तुमचे आरोग्य
तुमच्या लघवीच्या रंगवरुनही तुमचे आरोग्य कसे आहे किंवा तुम्हाला कोणता आजार आहे का ते ओळखता येते. लघवीचा रंग हा नेहमीच बदलत असतो, युरीनच्या रंगावरून आपल्याला नेमका काय आजार झाला आहे याची डॉक्टरांना कल्पना येते
आपले आरोग्य अनेक आजारांनी त्रासलेले असते. काही आजारांची लक्षणे स्पष्टपणे दिसतात अथवा जाणवतात, अशावेळी त्यावर त्वरीत उपचार करून हे आजार आटोक्यातही येतात. मात्र अनेकवेळा आजारांची लक्षणे दिसून येत नाहीत, किंवा काही काळानंतर ती लक्षात येतात. अशावेळी उपचारांसाठीही वेळ लागतो. मात्र तुम्हाला माहित आहे तुमच्या लघवीच्या रंगवरुनही तुमचे आरोग्य कसे आहे किंवा तुम्हाला कोणता आजार आहे का ते ओळखता येते. लघवीचा रंग हा नेहमीच बदलत असतो, युरीनच्या रंगावरून आपल्याला नेमका काय आजार झाला आहे याची डॉक्टरांना कल्पना येते असे ब्रिटनच्या विंडसर युरोलॉजीचे युरोलॉजिस्ट डॉ. मार्क लैनियाडो यांनी सांगितलं आहे. चला तर पाहूया काय सांगतात हे रंग
पिवळा रंग : तुम्ही निरोगी आहात.
गडद पिवळा : तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. तुम्हाला त्वरित पाणी प्यायला हवे.
लाल रंग : हा रंग लघवी मध्ये रक्ताची मात्रा असल्यामुळे होऊ शकतो. तुम्हाला किडनी, ट्युमर किंवा प्रोस्टेट आजार असल्याचे संकेतही हा रंग देतो. तसेच लघवीतून रक्त जात असेल तेव्हाही लघवीचा रंग लाल होतो.
केशरी किंवा ऑरेंज : यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता तसेच मिठाची मात्रा अधिक झाल्याचे समजावे. कधी कधी हे काविळीचेदेखील लक्षण मानले जाते.
निळा : याचा अर्थ काही जीवाणूंचा संसर्ग तुम्हाला झालेला आहे. अधिक प्रमाणात केक किंवा त्यावरचे आयसिंग खाल्ल्याने थोडक्यात अधिक प्रमाणात गोड खाल्ल्याने हा रंग येऊ शकतो.
ब्राऊन किंवा काळसर : एलकॅप्टॉनोरीया या दुर्मिळ अनुवंशीक विकारामध्ये लघवीचा रंग ब्राऊन अथवा काळसर होतो. (हेही वाचा : नसबंदीसाठी घाबरणाऱ्या पुरुषांसाठी खुशखबर; आता एकाच इंजेक्शनमुळे 13 वर्षांची चिंता मिटणार)
फेस येणे : लघवीत काही प्रमाणात फेस येत असेल तर तुम्ही घेत असलेल्या आहारात जास्त प्रोटीन आहेत. त्यामुळे आहारात प्रोटीनचे प्रमाण कमी करावे. असे नसल्यास किडनी संबंधीचा आजार झाला असू शकतो. जर सातत्याने लघवीतून फेस येत असेल तर डॉक्टरांची त्वरीत भेट घ्यावी.
लघवीचा वास येणे : लघवीला येणारा वास हादेखील आजारांसंदर्भातील तसेच शरीरातील बदलांसंदर्भातील सूचना देत असतो. हिरव्या भाज्यांचे अतिसेवन केल्याने लघवीचा वास बदलतो, लघवीत संसर्ग झालेला असेल तर वासाची तीव्रता वाढते, लघवीतून गोड वास येत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण मानले जाते, बरेचदा अँटिबायोटिक्स घेतल्यामुळेही लघवीचा रंग आणि वास यांवर परिणाम होतो.
आहारात पुरेशी प्रथिने घेतल्यास लघवी स्वच्छ व फेसाळ होते.मात्र एखादे इनफेक्शन अथवा किडनी स्टोन असल्यास मुत्रमार्गातील अडथळ्यांमुळे लघवी थांबत थांबत बाहेर पडते.
लघवी करताना कोणताही त्रास किंवा जळजळ होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेण्यास सुरुवात करायला हवी. विशेष म्हणजे पाणी कमी पिल्याने लघवीचे आजार सुरू होतात. त्यामुळे पाणी पिण्याचा कंटाळा करू नये आणि पाणी भरपूर प्यावे, जेणेकरून शरीरातील तापमान सामान्य राहून आजारांना अटकाव करण्यास मदत होईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)