Heart Health Tips: हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत 'हे' दोन पदार्थ; आहारात काळजीपूर्वक वापर करा
मात्र, या दोन्ही पदार्थाचे जास्त सेवन करण शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. मीठ आणि साखर यांचे शरीरात असंतुलित प्रमाण झाल्यास त्याचा हृदयावर परिणाम होतो.
Heart Health Tips: शरीर निरोगी ठेवण्यात साखर किंवा मीठ महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, या दोन्ही पदार्थाचे जास्त सेवन करण शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. मीठ आणि साखर यांचे शरीरात असंतुलित प्रमाण झाल्यास त्याचा हृदयावर परिणाम होतो.
मीठाचा हृदयावर परिणाम-
जेव्हा आपण रक्तदाब किंवा हृदयरोगांबद्दल विचार करतो, तेव्हा प्रथम विचार आपल्या आहारातील मीठाच्या प्रमाणाचा येतो. अनेक लोक आहारात मीठाचे सेवन करणं टाळतात. मीठाचे सेवन केल्याने हृदयाला कोणताही धोका नाही, असं वाटणं चुकीचं आहे. सोडियमचे सेवन कमी केल्याने काही लोकांमध्ये रक्तदाब कमी होऊ शकतो. परंतु, काही लोकांमध्ये कमी सोडियममुळे रक्तदाब वाढतो. कमी सोडियममुळे हृदयाची गती आणि हृदयदाब देखील वाढतो. (वाचा - Eating Benefits On The Floor: जमिनीवर वर बसून जेवल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे )
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीने एका दिवसात 1.5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाऊ नये. अन्यथा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. त्याच वेळी, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 1.5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.
सोडियम हे एक आवश्यक पोषक तत्व आहे आणि बर्याच अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, बहुतेक लोकांना हृदय निरोगी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज 3-6 ग्रॅम दरम्यान मीठाचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुतेक लोक या श्रेणीमध्ये सोडियम घेतात.
साखरेचा हृदयावर परिणाम -
साखरेचे जास्त प्रमाण हार्मोन्स खराब करतात. ज्यामुळे केवळ मधुमेहच नाही तर उच्च रक्तदाब देखील वाढतो. जे लोक दररोज निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा 25 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कॅलरी घेतात. अशा लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची शक्यता 3 पट जास्त असते.
साखरेचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा, दातांच्या समस्या, रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास होतो. तथापि, अमेरिकन मार्गदर्शक समितीने साखरपेक्षा मीठ अधिक हानिकारक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अन्न उद्योगास सोडियमची पातळी कमी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कमी सोडियमयुक्त अन्नाचा आपल्या शरीरावर तितकाच प्रभाव पडतो, जितका साखरेचे अधिक सेवन केल्याने होतो. उच्च प्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि लवकर मृत्यूचा धोका वाढतो.
सोडियम आणि साखरेचे संतुलित प्रमाणात ठेवण्यासाठी प्रक्रिया केलेले खाद्य खाणे टाळा आणि त्याऐवजी नैसर्गिगदृष्ट्या गोडवा आणि मीठ असणारे पदार्थ खा. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीरात पोटॅशियम, पाणी, फायबर आणि इतर घटकांचे योग्य संतुलन राहण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी, आहारात ताजे फळे आणि भाज्या खा.