Maharashtra Temperature: महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील तापमानात वाढ; जाणून घ्या वाढत्या उष्णतेशी लढण्यासाठी काही सोपे प्राथमिक उपचार

राज्यात अनेक शहरांमधील तापमानात वाढ झाली आहे. के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांत दिवसात कमाल तापमान सरासरी पेक्षा 5,6 अंश जास्त राहीले

उष्णता, प्रातिनिधिक प्रतिम (Photo Credits: JBER)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा तडाका वाढला आहे. राज्यात अनेक शहरांमधील तापमानात वाढ झाली आहे. के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार  मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांत दिवसात कमाल तापमान सरासरी पेक्षा 5,6 अंश जास्त राहीले. आता होसाळीकर यांनी अशा काही शहरे सांगितली आहे जिथे आह जास्तीत जास्त तापमान नोंदवले गेले. यामध्ये आज राज्यात सर्वात जास्त 41.2, तापमानाची नोंद चंद्रपूर येथे झाली आहे. त्यांनतर मुंबईमधील सांताक्रूझ 40.9, अकोला 40.4, जळगाव 40.4, सोलापूर 40.4 या ठिकाणी 40 अंशाच्या वर तापमान गेले आहे.

त्यांनंतर ब्रम्हपुरी 39.9, मालेगाव 39.8, परभणी 39.5, अमरावती व गडचिरोली 39, नाशिक 38.2, औरंगाबाद 38.2, सांगली 38.2, कोल्हापूर 38.2, पुणे 38.1, जालना, सातारा व कुलाबा येथे 38 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. मार्चमधील सर्वाधिक तापमान हे 28 मार्च 1956 रोजी नोंदवण्यात आले होते, ते 41.7 डिग्री सेल्सियस होते. सध्या उष्णता वाढत असल्याने लोकांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. मुख्यत्वे जे लोक बाहेर काम करत आहे, त्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होत आहे. त्यावर मात करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही प्राथमिक उपचार सांगितले आहेत.

या स्थितीमध्ये आपत्कालीन उपचार करावेत-

तीव्र उष्णतेमध्ये करावयाचे उपाय –

अधिक माहिती आणि सूचनांसाठी 104 वर कॉल करा, तसेच गंभीर समस्या उद्भवल्यास ताबडतोब दवाखान्यात न्या किंवा 108 वर कॉल करा. (हेही वाचा: Mumbai Temperature: मुंबईमध्ये उष्णता वाढली; आज 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद, उकाड्यामध्ये होणार अजून वाढ)

दरम्यान, होसाळीकर यांनी हे देखील सांगितले की, या तापमानामध्ये आणखीन वाढ होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.