दिवाळी मध्ये केवळ नरक चतुर्दशी दिवशी नव्हे तर नियमित अभ्यंग स्नान करण्याचे आहेत '7' आरोग्यदायी फायदे!

दिवाळीची केवळ प्रथा म्हणून नव्हे तर नियमित अभ्यंग स्नान करण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Abhyanga snan | Photo Credits: Instagram

महाराष्ट्रासह देशभरात वसूबारस पासून भाऊबीजेपर्यंत दिवाळीचा सण साजरा केला जातो. यापैकी नरक चतुर्दशी दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या दिवसात गुलाबी थंडीत सकाळी उठून गुलाब पाणी किंवा नारळ्याच्या दूधात उटणं मिसळून अभ्यंग स्नान करणं ही केवळ एक दिवसाची प्रथा नाही. दिवाळी प्रमाणेच इतर दिवशी देखील तेलाने मालिश करून अंगाला उटणं लावून अनेक समस्यांना दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. मग जाणून घ्या दिवाळीची केवळ प्रथा म्हणून नव्हे तर नियमित अभ्यंग स्नान करण्याचे नेमके आरोग्यदायी फायदे कोणते?

अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे

यंदा नरक चतुर्दशी 27 ऑक्टोबर दिवशी आहे. दिवाळीमध्ये नरक यातना, दोषांपासून सुटका मिळवण्यासाठी अभ्यंग स्नान केले जाते. यासाठी पहाटे उठून घरातील सारी पुरूष मंडळी पाटावर बसतात. त्यांचं औक्षण करून स्त्रिया, पत्नी, आई त्यांचा तेलाने मसाज करते. त्यानंतर उटणं लावलं जातं. पण ही पद्धत केवळ सणापुरती मर्यादीत नसून नियमित वापर करणं देखील आरोग्याला फायदेशीर आहे.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)