Fake Weight-Loss Drugs: बनावट वजन कमी करणारी औषधे विकणाऱ्या 250 वेबसाइट बंद; सायबर सिक्युरिटी फर्म BrandShield ची मोठी कारवाई
उत्पादने बनावट असल्याचा पुरावा गोळा केल्यानंतर कंपनी या वेबसाईट्स काढून टाकते आणि त्या साइट होस्ट करणाऱ्या सेवा प्रदात्यांना याबाबत माहिती दिली जाते. ब्रँडशील्डने गेल्या वर्षी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बनावट औषधांच्या 3,968 लिस्टिंग्ज काढून टाकल्या होत्या, त्यापैकी जवळपास 60% फेसबुकवर आढळून आल्या.
Fake Weight-Loss Drugs: वजन कमी करणे आणि मधुमेह रोखण्याच्या नावाखाली बनावट औषधे विकणाऱ्या 250 हून अधिक वेबसाइट बंद करण्यात आल्या आहेत. सायबर सिक्युरिटी फर्म ब्रेडशील्डने (BrandShield) जीएलपी 1 (GLP-1) वर्गातील औषधांच्या बाबत ही कारवाई केली आहे. कंपनीचे सीईओ योन केरेन यांनी सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मार्केट प्लेसशी संबंधित 6,900 हून अधिक बेकायदेशीर औषधे काढून टाकण्यात आली आहेत. यामध्ये भारतातील 992, इंडोनेशियातील 544, चीनमधील 364 आणि ब्राझीलमधील 114 औषधांचा समावेश आहे.
बेल्जियम, स्वित्झर्लंड, यूके आणि यूएससह किमान नऊ देशांमध्ये लठ्ठपणा कमी करण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांच्या, ओझेम्पिक आणि GLP-1 औषधांच्या इतर बनावट आवृत्त्यांशी संबंधित घातक परिणाम नोंदवले गेले आहेत. Novo Nordisk’s (NOVOb.CO), Ozempic आणि Wegovy आणि Eli Lilly’s (LLY.N), Mounjaro आणि Zepbound ही जीएलपी-1 औषधे आहेत. ही औषधे प्रामुख्याने टाइप 2 मधुमेहासाठी विकसित केली गेली होती.
जीएलपी-1 म्हणजेच Glucagon-like peptide-1 हा अमिनो ऍसिडवर आधारित पेप्टाइड संप्रेरक आहे, जो विशिष्ट न्यूरॉन्सच्या वतीने मेंदूला संदेश पाठवतो आणि भूक नियंत्रित करतो. म्हणूनच या औषधांचा उपयोग वजन कमी करण्यासाठीही केला जातो. असे आढळून आले आहे की ही, औषधे रुग्णांचे वजन सरासरी 20 टक्क्यांनी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्यांची मागणी वाढली आणि परिणामी त्यांच्या बनावट आवृत्त्या बाजारात आल्या. आता अशी बनावट औषधे विकणाऱ्या साईट्सवर ब्रेडशील्डने कारवाई केली आहे. ब्रँडशील्डने या वेबसाईट्स काढण्यासाठी फार्मास्युटिकल सेफ्टी इन्स्टिट्यूट (PSI) या उद्योग-समर्थित संस्थेसोबत काम केले. (हेही वाचा: Protein Supplements Mislabeled In India: सावध रहा! भारतात उपलब्ध असलेल्या 70 टक्के प्रोटीन सप्लिमेंट्सचे लेबल चुकीचे; सर्वेक्षणातून समोर आले धक्कादायक सत्य)
उत्पादने बनावट असल्याचा पुरावा गोळा केल्यानंतर कंपनी या वेबसाईट्स काढून टाकते आणि त्या साइट होस्ट करणाऱ्या सेवा प्रदात्यांना याबाबत माहिती दिली जाते. ब्रँडशील्डने गेल्या वर्षी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बनावट औषधांच्या 3,968 लिस्टिंग्ज काढून टाकल्या होत्या, त्यापैकी जवळपास 60% फेसबुकवर आढळून आल्या. दरम्यान, याआधी यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने डिसेंबरमध्ये सांगितले की, ते कायदेशीर यूएस औषध पुरवठा साखळीतील बनावट ओझेम्पिकची चौकशी करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)