Reduce the Risk of Dengue During Monsoon: पावसाळ्यामध्ये वाढणाऱ्या डेंग्यू आजाराचा धोका कसा कमी करावा?
तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागील वेदना, सांधे आणि स्नायू दुखणे, पुरळ आणि सौम्य रक्तस्त्राव ही त्याची लक्षणे आहेत. साचलेल्या पाण्यामुळे पावसाळ्यात डेंग्यू आजाराचा धोका वाढतो. हा आजार डासांमुळे होतो आणि डास प्रतिबंध (Mosquito Prevention) केल्यास तो टाळता येतो.
डेंग्यू (Dengue) हा एडिस इजिप्ती (Aedes Aegypti) डासांद्वारे पसरणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागील वेदना, सांधे आणि स्नायू दुखणे, पुरळ आणि सौम्य रक्तस्त्राव ही त्याची लक्षणे आहेत. साचलेल्या पाण्यामुळे पावसाळ्यात डेंग्यू आजाराचा धोका वाढतो. हा आजार डासांमुळे होतो आणि डास प्रतिबंध (Mosquito Prevention) केल्यास तो टाळता येतो. पावसाळ्यात साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकुल परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी काही खबरदारी घेतल्यास डेंग्यूचा धोका कमी करण्यात मदत होते. कोणती काळजी घेतल्याने या आजाराचा धोका कमी होतो याबाबत येथे काही टीप्स देण्यात आल्या आहेत.
डेंग्यूचा धोका कमी करण्यासाठी खबरदारीच्या टिप्स
पाण्याचा निचरा करा: साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. त्यामुळे परिसरात असलेल्या पाण्याचा निचरा करा. नियमितपणे तुमच्या घराच्या आजूबाजूच्या भागात वनस्पतींचे सॉसर (जसे की नारळाच्या कवट्या), रिकाम्या बादल्या आणि जुने टायर यांसारख्या वस्तूंमध्ये पाणी साठते. ते साठू देऊ नका. त्या वस्तूंमधील पाणी सातत्याने रिकामे करा. नाले, गटारे तुंबलेले नाहीत याची खात्री करा. डासांना अंडी घालण्यापासून रोखण्यासाठी कोणतेही पाणी साठवण्याची वस्तू झाकून ठेवा. जेणेकरुन डास त्यावर अंडी घालणार नाहीत. (हेही वाचा, Dengue Outbreak in West Bengal: डासांनी गच्च भरलेली पिशवी घेऊन रुग्ण दवाखण्यात, पश्चिम बंगालमध्ये डेंग्यू उद्रेकाची भीती)
मॉस्किटो रिपेलेंट्स वापरा: डासांच्या चाव्यांपासून बचाव करण्यासाठी उघड्या त्वचेवर आणि कपड्यांवर डास प्रतिबंधक लावा. अतिरिक्त संरक्षणासाठी मच्छर कॉइल किंवा इलेक्ट्रिक व्हेपर मॅट्स सारख्या इनडोअर रिपेलेंट्स वापरा.
संरक्षक कपडे घाला: डास चावण्यापासून त्वचेचा संपर्क कमी करण्यासाठी लांब बाही असलेले शर्ट, लांब पँट, मोजे आणि शूज घाला. विशेषत: पहाटे आणि सायंकाळच्या वेळी जेव्हा डास अधिक सक्रिय असतात. (हेही वाचा, Dengue Symptoms And Treatment: पावसाच्या पाण्यात झपाट्याने वाढतात डेंग्यूचे डास; 'ही' लक्षणे दिसल्यास करा त्वरित तपासणी)
डासांना अडथळे निर्माण करा: खिडक्या आणि दरवाज्यांवर पडदे डासांना घराबाहेर ठेवण्यास मदत करतात. इतर प्रतिबंधात्मक उपायांसह एकत्रित केल्यावर ही अडथळा पद्धत प्रभावी आहे. बेड नेट वापरण्याचा विचार करा. विशेषतः जर तुम्ही दिवसा झोपत असाल जेव्हा डास सक्रिय असतात.
मच्छरदाणी वापरा: झोपताना मच्छरदाणी वापरल्याने डासांचा शरीराशी येणारा संपर्क कमी होतो. झोप छान लागते. शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. ही मच्छरदाणी वापरताना ती कोठेही फाटली नाही आणि गादीखाली सुरक्षीत सरकवलेली असेल याची खात्री करा.
परिसर स्वच्छ ठेवा: स्वच्छ वातावरणामुळे डासांची उत्पत्ती कमी होते. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा आणि पाणी साचू नये म्हणून गटारी नियमितपणे स्वच्छ करा. नीटनेटके घर आणि परिसर डेंग्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.
फुलदाण्यांमध्ये आणि कंटेनरमध्ये पाणी बदला: डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा फ्लॉवर वेस, बर्ड बाथ आणि पाळीव प्राण्यांच्या भांड्यांमधील पाणी बदला. या डब्यांच्या आतील बाजू घासल्याने डासांची अंडी आणि अळ्या निघून जातात आणि डेंग्यूचा धोका आणखी कमी होतो.
या सावधगिरीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन केल्याने, पावसाळ्यात डेंग्यूचा संसर्ग होण्याचा धोका तुम्ही मोठ्या प्रमाणात कमी करू शकता. वैयक्तिक आणि सामुदायिक प्रयत्नांना एकत्रित केल्याने या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी एक व्यापक दृष्टीकोन सुनिश्चित होतो.