Chapare Virus: एकातून दुसर्या माणसाला संसर्ग करू शकणार्या चापरे वायरस ची लक्षणं काय? जाणून घ्या COVID-19 तुलनेत किती धोकादायक
तर दिलासादायक बाब म्हणजे कोविड प्रमाणे चापरे शिंक, खोकल्याच्या ड्रॉपलेट्समधून पसरत नाही. तो bodily fluids द्वारा पसरतो.
कोरोना वायरसच्या थैमानाला सुरूवात होऊन काल (17 नोव्हेंबर) वर्षपूर्ती झाली आहे. मात्र यामध्येच आता अमेरिकेच्या Centers for Disease Control and Prevention ने चापरे (Chapare) या नव्या जीवघेण्या आणि एका माणसातून दुसर्या माणसामध्ये संसर्ग करू शकणार्या वायरसचा धोका वर्तवला आहे. यामध्येदेखील इबोलाप्रमाणे Haemorrhagic Fever होतो. मात्र दिलासादायक बाब म्हणजे या वायरसमुळे मोठं आरोग्यसंकट म्हणजेच Pandemic ची शक्यता कमी आहे. पण हा आजार जीवघेणा असल्याने त्याबद्दल सतर्क राहणं गरजेचे असल्याने जाणून घ्या नेमका हा आजार काय? कुठे आढळला? धोकादायक किती आणि नेमकी Chapare ची लक्षणं काय आहेत?
Chapare Haemorrhagic Fever बद्दल काही खास गोष्टी!
- चापरे वायरस(Chapare virus)हा पहिल्यांदा 2004 साली Bolivian मध्ये चापरे भागात आढळल्याने त्याला Chapare virus संबोधले जाते. त्याच वर्षी तो गायब देखील झाल्यानंतर 2019 मध्ये 5 जणांना त्याची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता.
- चापरे वायरसचा संसर्ग bodily fluids द्वारा होतो. sciencetimes.com च्या माहितीनुसार यावर्षी अद्याप अॅक्टिव्ह रूग्णांची नोंद नाही.
- Pan-American Health Organization (PAHO)आणि Centers for Disease Control and Prevention यांनी केलेल्या या वायरसच्या संशोधनानंतर त्याचं निदान करण्यसाठी खास आरटी पीसीआर टेस्ट देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
- एका माणसातून दुसर्या माणसामध्ये संसर्ग करू शकणारे हे वायरस इंफेक्स्टेट व्यक्तीच्या semen मध्ये 24 आठवडे किंवा 168 दिवसांपर्यंत राहू शकतात.
- दरम्यान पहिल्या चापरे वायरस बाधित व्यक्तीच्या घराजवळ rodents म्हणजे उंदरांमध्येही तो आढळला होता. मात्र तज्ञांच्या मते उंदीर अद्याप त्या आऊटब्रेकचे कारण असल्याचा कोणताही पुरावा नाही.
Chapare Haemorrhagic Fever ची लक्षणं
चापरे वायरसची बाधा झाल्यानंतर ताप येणं, पोटदुखी, उलट्या होणं, हिरड्यांतून रक्त येणं, अंगावर रॅश येणं, वेदना होणं ही लक्षणं दिसतात.
कोविड 19 प्रमाणे चापरे वायरसवरही अद्याप कोणताही ठोस उपाय नाही. तर दिलासादायक बाब म्हणजे कोविड प्रमाणे चापरे शिंक, खोकल्याच्या ड्रॉपलेट्समधून पसरत नाही. तो bodily fluids द्वारा पसरतो. हा नॉन रेस्पिरेटरी वायरस असल्याने त्याला रोखणं तुलनेत सोपे आहे.