Savitribai Phule Death Anniversary: सावित्रीबाई फुले, भारतातील पहिल्या महिला शिक्षक अर्थात समाजपरिवर्तनाची धगधगती मशाल
त्यांच्या निधनाने भारतातील एका धगधगती सामाजपरीवर्तनाची मशाल विझली. मात्र, त्यांनी सुरु केलेली शिक्षणाची आणि त्यातही खास करुन महिला शिक्षणाची मशाल अखंड धगधगत आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule). महात्मा ज्योतीबा फुले (Jyotirao Phule) यांच्या पत्नी. पण, केवळ समाजसुधारक जोतीराव फुले यांच्या पत्नी इतकीच त्यांच्या कार्याची ओळख नव्हे बरं. त्याही पलीकडे त्यांचे कार्य आणि त्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. त्यांचे कार्य पाहिल्यावर त्या समाजपरिवर्तनाची धगधगती मशालच आहेत असे वाटते. अशा सावित्रीबाई फुले यांची आज (10 मार्च) जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त (Savitribai Phule Death Anniversary ) आज विविध कर्यक्रम, उपक्रम राबवले जातील. भाषणे ठोकली जातील. इतिहास पाहता सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या समाजपरीवर्तनाची फळे सर्वजणच चाखत आहेत. परंतू, त्यांच्या कार्याची हवी तेवढी दखल मात्र आजही घेतली गेली नाही. घेतली जात नाही हेही एक वास्तव. जयंतीनिमित्ती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर टाकला हा एक अल्पसा कटाक्ष.
- शिक्षण क्षेत्रात सावीत्रीबाई फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी अशिया खंडातील मुलींची पहिली शाळा सुरु केली. महिला शिक्षण आणि तळागाळातील लोकांपर्य शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापीकाही होत्या. इतकेच नव्हे तर शैक्षणीक वर्तुळासोबतच त्या इतर समाजकार्यातही कार्यरत होत्या. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन केले जात असे. ही प्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी न्हाव्यांचा संपक घडवून आणला होता.
- सावित्रीबाई फुले यांनी पती जोतिबा फुले यांच्या मदतीने 1 मे 1847 रोजी पहिली शाळा सुरु केली. ही शाळा फार काळ चालली नाही. पुढे पुणे येथील बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात 1 जानेवारी 1848 रोजी फुले दाम्पत्याने (सावित्रीबाई, जोतीबा फुले) नव्याने शाळा सुरु केली.
- सावित्रीबाई फुले यांना शिक्षण क्षेत्रात काम करताना समाजातून प्रचंड विरोध झाला. त्यांच्या आंगावर दगड, शेण यांचा माराही करण्यात आला. परंतू, पती जोतीराव फुले यांचे पाठबळ असल्याने सावित्रीबाई अजिबात डगमगल्या नाहीत. केवळ चार वर्षांमध्ये त्यांनी 18 शाळा सुरु केल्या. केवळ सुरुच केल्या नाहीत तर त्या चांगल्या पद्धतीने चालवल्या. ब्रिटीशकालीन भारतात एका भारतीय व्यक्तीने काढलेली मुलींची ही पहिलीच शाळा होती.
सावित्रीबाई फुले यांची पुस्तके
काव्यफुले (काव्यसंग्रह), सावित्रीबाईंची गाणी (1891), सुबोध रत्नाकर
बावनकशी, जोतिबांची भाषणे (संपादक सावित्रीबाई फुले 1856)
सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे निधन प्लेग या आजाराने 10 मार्च 1897 मध्ये झाले. त्यांच्या निधनाने भारतातील एका धगधगती सामाजपरीवर्तनाची मशाल विझली. मात्र, त्यांनी सुरु केलेली शिक्षणाची आणि त्यातही खास करुन महिला शिक्षणाची मशाल अखंड धगधगत आहे.