Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनाची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या; वाचा 'या' सणाचे विशेष महत्त्व आणि इतिहास

भाऊ बहिणींच नात आणखी फुलवण्यासाठी तसेच प्रेम समर्प्रित करण्यासाठी श्रावण महिन्यात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.

Raksha Bandhan | File Image

Raksha Bandhan 2023:  श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते. भाऊ बहिणींच नात आणखी फुलवण्यासाठी तसेच प्रेम समर्प्रित करण्यासाठी श्रावण महिन्यात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरा केली जाते. हा हिंदू धर्मातला विशेष सण यंदा ३० ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. काही भागात हा सण राखी म्हणून देखील ओळखला जातो. यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते जाणून घेण्यासाठी हे लेख वाचा

भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन हा सण भाऊ- बहिणीचं प्रेम आणि कर्तव्या संबंधीत म्हणून साजरा केला जातो.देशभरात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते.  उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो. या सणामध्ये रेशीम धाग्याला विशेष महत्त्व दिले जाते.

रक्षाबंधन 2023: तारीख आणि शुभ मुहूर्त वेळ

यावर्षी 30 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. रात्री ९.०१ नंतर शुभ मुहूर्त सुरू होतो.विधीसाठी भाद्र समाप्ती वेळ रात्री 9:01 आहे. यंदा रक्षाबंधन बुधवारी होणार आहे. राख्या बांधण्याची योग्य वेळ भद्राकालच्या समाप्तीनंतर रात्री ९:०१ नंतर सुरू होईल.

रक्षाबंधन सणाचे महत्त्व आणि इतिहास

रक्षाबंधन हा सण प्राचीन काळापासून सुरु असल्याचे मानले जाते. एवढंच नाही तर ती पौराणिक कथा आणि ऐतिहासिक कथांशी जोडलेली आहेत. हिंदू पौराणिक कथेनुसार, दुष्ट राजा शिशुपालशी लढताना द्रौपदीने भगवान कृष्णाच्या मनगटावर कापडाचा तुकडा बांधला होता. त्या बदल्यात भगवान श्रीकृष्णाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. म्हणून हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व दिले जात आहे.

मध्ययुगीन इतिहासातील आणखी एक महत्त्वपूर्ण कथा मेवाडच्या राणी कर्णावतीने सम्राट हुमायूनला तिच्या राज्यावर गुजरातच्या बहादूर शाहकडून आक्रमण होत असताना मदतीसाठी राखी पाठवल्याची कथा सांगते. तिची ही माया पाहून हुमायून तिच्या मदतीला धावून आला. हुमायूनने तीच्या रक्षणासाठी प्राणाची आहूती दिली.

भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. या दिवशी बहिण आपल्या भावाची देवा कडे दिर्घआयुष्याची प्रार्थना करते. पुरातन काळापासूनच या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मात हा सण साजरा करणं म्हणजे हिंदू धर्म जपण्या सारखं आहे. प्रेमरुपी आपण आपल्या भावाला राखी बांधतो. या सण भाऊ आणि बहिणींमध्ये मांगल्य आणि पावित्र्य निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.