World Population Day: 'जागतिक लोकसंख्या दिन' निमित्त जाणून घ्या जगातील 7 खंडामध्ये राहणाऱ्या लोकांची थक्क करणारी आकडेवारी
11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज झाली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले.1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो.
World Population Day: 11जुलै हा दिवस जगभरात जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. 11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज झाली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले.1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो.
या दिवसाचे औचित्य साधून जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजित केले जाते. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. शैक्षणिक स्पर्धा, शैक्षणिक माहिती सत्रे, निबंधलेखन स्पर्धा, विविध विषयांवर सार्वजनिक स्पर्धा, पोस्टर वितरण, गाणी, क्रीडाविषयक कार्यक्रम, व्याख्याने आणि कविता, कार्यशाळा, भाषणे, वादविवाद, पत्रकार परिषदा, विविध वृत्तवाहिन्या आदी कार्यक्रमाच्या माध्यमांतून नागरिकांमध्ये लोकसंख्या वाढीच्या समस्येवर चर्चा केली जाते. 2019 पर्यंत जगात 770 कोटी इतकी लोकसंख्या होती. त्यात आता आणखी वाढ झालेली आहे. दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. जगात सर्वाधिक लोकसंख्या असणारे खंडामध्ये आशिया खंडाचा पहिला क्रमांक लागतो.
जगात सर्वाधिक लोकसंख्या असणारे खंड -
आशिया (लोकसंख्या: 446.27 कोटी)
आफ्रिका (लोकसंख्या: 121.6 कोटी)
युरोप (लोकसंख्या: 73.8 कोटी)
उत्तर अमेरिका (लोकसंख्या: 57.9 कोटी)
दक्षिण अमेरिका (लोकसंख्या: 42.2 कोटी)
ऑस्ट्रेलिया खंड (लोकसंख्या: 39.9 कोटी)
अंटार्टिका (लोकसंख्या: 1200 केवळ संशोधक)
जगात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. 1 जानेवारी, 2014 रोजी जागतिक लोकसंख्या 7 अब्ज 13 कोटी 76 लाख 61 हजार 30 वर पोहोचली. वाढीत्या लोकसंख्येचे प्रत्येक देशावर विविध स्वरुपाचे घातक परिणाम होत असतात. त्यामुळे लोकसंख्या वाढीस वेळीस आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी कुटुंब नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे. केंद्र सरकारकडून लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कुटुंब नियोजन कार्यक्रमावर जास्तीत-जास्त भर दिला जातो.