IPL Auction 2025 Live

Savitribai Phule Quotes In Marathi: सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त Greetings, WhatsApp Status, Wallpapers द्वारे शेअर करा क्रांतीज्योतीचे प्रेरणादायी विचार!

त्यांचे विचार आजही सर्वांसाधी प्रेरणादायी ठरतात. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही Greetings, WhatsApp Status, Wallpapers द्वारे त्यांचे विचार सोशल मीडियावर शेअर करून त्यांना अभिवादन करू शकता.

Savitribai Phule Quotes (PC - File Image)

Savitribai Phule Quotes In Marathi: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची पुण्यतिथी 10 मार्च रोजी साजरी केली जाते. या दिवशी त्यांचे निधन झाले होते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा (Satara) येथील नायगाव (Naygaon) या छोट्याशा गावात एका दलित कुटुंबात झाला. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 13 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यांनी त्यांचे पती, क्रांतिकारी नेते ज्योतिराव फुले यांच्यासमवेत मुलींसाठी 18 शाळा उघडल्या होत्या. पहिली शाळा, पुणे कन्या शाळा, 1848 मध्ये उघडण्यात आली.

समाजात प्रचलित असलेल्या वाईट प्रथांना सावित्रीबाईंनी विरोध केला, ज्या विशेषतः स्त्रियांच्या विरोधात होत्या. त्यांनी सती प्रथा, बालविवाह आणि विधवा पुनर्विवाह बंदी याविरुद्ध आवाज उठवला आणि आयुष्यभर त्यासाठी लढा दिला. प्लेगच्या रूग्णांची काळजी घेत असताना त्या स्वतःच याच्या शिकार झाल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे विचार आजही सर्वांसाधी प्रेरणादायी ठरतात. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही Greetings, WhatsApp Status, Wallpapers द्वारे त्यांचे विचार सोशल मीडियावर शेअर करून त्यांना अभिवादन करू शकता. (वाचा - Savitribai Phule Death Anniversary: स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका, जाणून घ्या सावित्रीबाई फुले यांच्या समाज कार्याविषयी)

Savitribai Phule Quotes (PC - File Image)
Savitribai Phule Quotes (PC - File Image)
Savitribai Phule Quotes (PC - File Image)
Savitribai Phule Quotes (PC - File Image)
Savitribai Phule Quotes (PC - File Image)

सावित्रीबाई फुले यांनी एका विधवा ब्राह्मण महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले. तसेच तिच्या नवजात मुलाला दत्तक घेतले. यशवंत राव असे त्यांचे नाव होते. शिक्षण घेतल्यानंतर ते डॉक्टर झाले. 1897 मध्ये त्यांचा मुलगा यशवंत राव यांच्यासमवेत त्यांनी प्लेगच्या रूग्णांच्या उपचारासाठी हॉस्पिटल उघडले. 28 जानेवारी 1853 रोजी त्यांनी गर्भवती बलात्कार पीडितांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. सावित्रीबाईंनी एकोणिसाव्या शतकात अस्पृश्यता, सती, बालविवाह आणि विधवा पुनर्विवाह बंदी यांसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध आपल्या पतीसोबत एकत्र काम केले.