Navratri 2023 Messages: नवरात्र उत्सवानिमित्त खास मराठी Wishes, Greetings, Images शेअर करून द्या देवीच्या उपासनेच्या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. या काळात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते, घरात घट बसवला जातो.
उद्यापासून म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात होत आहे. हा सण देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. नवरात्र म्हणजे नऊ रात्री. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहावा दिवस दसरा म्हणून साजरा होतो. शारदीय नवरात्र दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि दशमी तिथीला आई दुर्गेच्या मूर्तीच्या विसर्जनाने समाप्त होते.
नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. या काळात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते, घरात घट बसवला जातो.
नवरात्रीचे पहिले तीन दिवस दुर्गा देवीच्या उपासनेसाठी समर्पित आहेत. ही पूजा देवीची उर्जा आणि शक्तीसाठी केली जाते. प्रत्येक दिवस दुर्गेच्या वेगळ्या रूपाला समर्पित आहे. नवरात्रीचा चौथा, पाचवा आणि सहावा दिवस समृद्धी आणि शांतीची देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी समर्पित आहेत. सातव्या दिवशी कला आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने सरस्वतीची प्रार्थना केली जाते.
आठव्या दिवशी 'यज्ञ' केला जातो. हा एक यज्ञ आहे जो देवी दुर्गेचा सन्मान करतो आणि तिला निरोप देतो. नववा दिवस म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस. याला महानवमी असेही म्हणतात. या दिवशी कन्यापूजा केली जाते, ज्यामध्ये नऊ मुलींची पूजा होते. या नऊ मुलींना दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक मानले जाते. (हेही वाचा: PM Narendra Modi Garbo Song: पीएम नरेंद्र मोदींनी लिहिले 'गरबो' गाणे; नवरात्रीच्या आधी प्रदर्शित झाला म्युझिक व्हिडिओ)
तर अशा या मंगलमय सणानिमित्त तुम्ही खास मराठी Messages, Greetings, Quotes, HD Images, Wishes, Wallpapers शेअर करून तुमचे मित्र-मैत्रिणी, प्रियजन, नातेवाईकांना नवरात्र आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, पौराणिक कथेनुसार, महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे 9 दिवस युद्ध करून देवीने दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला. त्यानंतर तिला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणू लागले. म्हणून आपण नवरात्री साजरी करतो. यासह, मान्यता आहे की, भगवान रामाने 9 दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी रावणाचा वध केला. हा दिवस विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरा होतो. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे. असत्यावर सत्याच्या विजयचा प्रतीक आहे म्हणजे दसरा होय.