Mahad Satyagraha Anniversary: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील जातीयवाद मिटवण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न 'चवदार तळे सत्याग्रह'; जाणून घ्या या घटनेविषयी
आजवर जातीयवाद, अस्पृश्यता या कुवृत्तीच्या विरुद्ध झालेल्या आंदोलनात आजचा दिवस म्हणजेच महाड सत्याग्रह दिन (Mahad Satyagraha) अतिशय महत्वाचा मानला जातो.या महत्वाच्या दिवसाविषयी काही खास गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
आजवर जातीयवाद, अस्पृश्यता या कुवृत्तीच्या विरुद्ध झालेल्या आंदोलनात आजचा दिवस म्हणजेच महाड सत्याग्रह दिन (Mahad Satyagraha) अतिशय महत्वाचा मानला जातो. 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी दलितांच्या सोबत जाऊन महाड येथील निषिद्ध असणाऱ्या चवदार तळ्याचे (Chavdar Tale) पाणी चाखले होते. ह्या तळ्याच्या आजूबाजूला सुद्धा दलितांना प्रवेश नाकारला जात होता त्याच ठिकाणी आंबेडकरांनी हा सत्याग्रह केला होता. समाजातील दुबळ्या मानल्या जाणाऱ्या वर्गाला वर आणण्यासाठी हे महत्वाचे पाऊल असल्याने हाच दिवस आज सामाजिक सबलीकरण दिन म्ह्णून देखील साजरा केला जातो. या महत्वाच्या दिवसाविषयी काही खास गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ मधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
दलितांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी मुंबई कायदे मंडळाने 1923 साली एक नवा नियम जारी केला होता ज्यानुसार, सार्वजनिक ठिकणाई सरकारी खर्चातून बांधण्यात आलेल्या सर्व सुविधांवर कोणताही भेदभाव न करता सर्वांचा ( दलितांसहित) वापर हक्क असेल असे सांगण्यात आले होते, 1924 मध्ये महाड नगरपालिकेने शुद्ध अय निर्णयाची मलबजावणी करण्याचे आदेश दिले होते, मात्र जरी कायदेसीर अंमलबजावणी झाली असली तरी सामाजिक स्तरावर उच्च जातीय वर्गांकडून दलितांचे हे हक्क मारलेच जात होते, या विरुद्ध आवाज उठवण्यासाटःई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आणि त्यातूनच हा महाडचा सत्याग्रह करण्याची कल्पना सुचली.
20 मार्च रोजी म्हणजेच सत्याग्रहाच्या दिवशी, तब्बल 5000 हुन अधिक पुरुष व महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, चवदार तळ्यावर जाण्यापूर्वी आंबेडकर यांनी या जमावासमोर एक सभा घेतली ज्यात, आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्री-पुरुषांना आवाहन केले. त्यांनतर सर्वांच्या समवेत, डॉ. आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे पाणी हातात घेऊन चाखले त्यासोबतच इतरही उपस्थित महिला पुरुषांनी हे पाणी चाखत समतेचा संदेश दिला. या प्रसंगाचे वैशिष्ट्य असे की, यावेळी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी तत्कालीन अनेक स्पृश्य पुढारी मंडळी सुद्धा उपस्थित होती, यात अनंतराव चित्रे, सुरेंद्र टिपणीस, गंगाधर सहस्त्रबुद्धे ही काही नावे समाविष्ट आहेत.
महाड येथे चवदार तळ्याच्या काठी झालेल्या या संग्रामास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते. यांनतर खऱ्या अर्थाने अस्पृश्यांच्या चळवळीला आणखीन वेग मिळाला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)