How To Celebrate Kojagiri Purnima 2020 : 'कोजागरी पौर्णिमा' कशी साजरी करावी; जाणून घ्या सविस्तर

मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे.या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.ह्या दिवशी पाळाल्या जाणाऱ्या व्रताला 'कोजागरव्रत' असे म्हणतात. आज जाणून घेऊयात कोजागरी पौर्णिमा' कशी साजरी करावी.

अश्विन पौर्णिमा हीच 'कोजागरी पौर्णिमा' (Kojagiri Purnima) किंवा शरद पौर्णिमा (Sharad Purnima) म्हणून साजरी केली जाते. अश्विन पौर्णिमा (Ashwin Purnima) हा भारतीय धर्म संस्कृतीतील महत्वाचा दिवस मानला जातो. ही पौर्णिमा शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते.  यावर्षी 'कोजागरी पौर्णिमा' 30 ऑक्टोबर 2020 रोजी आहे. या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे.या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.ह्या दिवशी पाळाल्या जाणाऱ्या व्रताला 'कोजागरव्रत' असे म्हणतात. (Eid-e-Milad un Nabi 2020 Mehndi Designs: ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने पाहूयात काही सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन( Watch Video)

आज जाणून घेऊयात 'कोजागरी पौर्णिमा' कशी साजरी करावी.

दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी; या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. या दिवशी नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने) जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात आणि मग आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे. त्यामुळे हे दूध आरोग्यदायी आहे. या रात्री जागरण करतात. करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात. दुसर्‍या दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात.

लक्ष्मी आणि इंद्र यांचा पूजाविधी

लक्ष्मी आणि इंद्र यांच्या पूजेत पोहे आणि नारळाचे पाणी वापरतात. पोहे हे आनंद देणारे, तर नारळाचे पाणी हे शीतलता प्रदान करणारे आहे. त्यामुळे हे दोन घटक वापरून जीव स्वतःकडे आनंद आणि शीतलता यांच्या लहरी आकर्षित करत असतो.चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात; कारण या दिवशी दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहिल्याने त्यातून प्रक्षेपित होणारे चंद्रतत्त्व आपल्याला मिळते. या दुधात स्थूल आणि सूक्ष्म रूपांतून चंद्राचे रूप अन् तत्त्व आकर्षित झालेले असते.

यंदा शरद पूर्णिमा 30 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांपासून सुरू होणार असून शरद पूर्णिमा 31 ऑक्टोबरला रात्री 8 वाजून 18 मिनिटांपर्यंत असणार आहे