Holika Dahan 2020 Muhurat: जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त, पूजा विधि ते यंदा होळीचा सण खास करणारा 499 वर्षांनंतर जुळून आलेला दुर्लभ योग!
या वर्षि होलिका दहनाच्या दिवशी शनी आणि गुरू आपल्या स्वतःच्या राशीमध्ये असलेल्या यंदाची होळी स्पेशल आहे.
Holi 2020 Shubh Muhurat: हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रासह देशभरात होळीचा सण सज साजरा केला जातो. मनातील दु:ख, विनाशी विचार आणि सार्या वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी होलिका दहन केले जाते. आज (9 मार्च) च्या संध्याकाळी होलिका दहनाचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या वर्षि होलिका दहनाच्या दिवशी शनी आणि गुरू आपल्या स्वतःच्या राशीमध्ये असलेल्या यंदाची होळी स्पेशल आहे. सुमारे 499वर्षांनंतर हा योग यंदा जुळून आला आहे. तसेच 1521नंतर यंदा हा योग आल्याने होलिका दहनचा आनंद यंदा द्विगुणित होणार आहे. तसेच यंदा भद्र काळ म्हणजे अशुभ काळ नसल्याने होलिका दहन आनंदाने आणि धुमधडाक्यात सर्वत्र साजरी केली जाणार आहे. दरम्यान सामुहिकरित्या साजर्या केल्या जाणार्या होलिका दहनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन तुम्हांलाही प्रार्थना करायची असेल तर जाणून घ्या आज होलिका दहनाची शुभ मुहूर्ताची वेळ काय? पूजा विधी काय आहेत? Happy Holi 2020 Wishes: होळी च्या शुभेच्छा देणारे मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करुन साजरा करा रंगांचा, आनंदाचा हा धम्माल सण!
होलिका दहन 2020 शुभ मुहूर्त
आज सोमवार, 9 मार्च दिवशी होलिका दहन संध्याकाळी 6.27 ते 8.52 पर्यंतच्या काळात केले जाते. होलिका दहनासाठी आंबा, माड यांच्यासारख्या झाडांच्या झावळ्या, पालापाचोळा, लाकडं यांना एकत्र रचून होळी बनवली जाते. त्यानंतर होळीची पूजा करून तिचे दहन केले जाते. यामध्ये नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे तसेच पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो. महाराष्ट्राच्या अनेक भागात होलिका दहन केल्यानंतर बोंबा मारणं, आरोळी ठोकणं अशी पद्धत आहे. यामागे असुरी शक्तींना दूर ठेवण्याची कामना असते.
दरम्यान यंदा होलिका दहनावर भद्र काळाची छाया नसल्याने आनंदाने दिवसभर होळीचा आनंद साजरा केला जाऊ शकतो. आज रात्री होलिका दहन झाल्यानंतर दुसर्यादिवशी दूधाने ती विझवली जाते. Shimga Festival 2020: शिमगोत्सव निमित्त कोकणात दशावतार, जाखाडी नृत्य ते ग्रामदैवतेची पालखी नाचवणं असा असतो होळी सणाचा उत्साह!
होळी सणाच्या पौराणिक कथा
- भगवान श्रीकृष्ण लहान असतांना त्याला ठार मारण्यासाठी कंसाने पूतना राक्षसीला पाठवले. ती विषारी दूध पाजीत असतानाच तिचा प्राण शोषून कृष्णाने दुष्ट पूतना राक्षसीला यमसदनाला पाठवले. या पूतना राक्षसीला होळीच्या दिवशी रात्रीच्यावेळी जाळण्यात येते.
- भविष्यपुराणातील गोष्टीप्रमाणे पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होळी पेटवून होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावातील मुलांना ढुंढा राक्षसी त्रास देत नाही असा समज आहे.
फाल्गुन पौणिमा ते पंचमी असा पाच दिवस होळीचा सण होलिका दहन, धुळवड आणि रंगपंचमी असा खेळला जातो. होळीचं आगमन म्हणजे वसंत ऋतूची चाहुल असते. होळीनंतर वातावरणात हळूहळू बदल होण्यास सुरूवात होते. तसेच उष्णता वाढते. त्यामुळे होळीचा आनंद लूटताना तुमच्या आरोग्याचीदेखील काळजी घ्या. लेटेस्टली परिवाराकडून तुम्हा सार्यांना होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्छा!