Shivrajyabhishek Sohala 2020: शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

शिवरायांनी 6 जून 1674 रोजी शिवरायांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्यभिषेक सोहळा करून घेतला. तिथीप्रमाणे येणारा राज्याभिषेकाचा दिवस दिवस 4 जूनला, तर तारखेप्रमाणे हा दिवस 6 जूनला साजरा केला जातो. शिवाजी महाराज यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही सर्वांच्या मनात प्रभाव करते. शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त आज आपण या लेखातून शिवरायांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

छत्रपति शिवाजी महाराज (Photo Credits: Instagram)

Shivrajyabhishek Sohala 2020: आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharanja) यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. शिवरायांनी 6 जून 1674 रोजी शिवरायांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्यभिषेक सोहळा करून घेतला. तिथीप्रमाणे येणारा राज्याभिषेकाचा दिवस दिवस 4 जूनला, तर तारखेप्रमाणे हा दिवस 6 जूनला साजरा केला जातो.

शिवाजी महाराज यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही सर्वांच्या मनात प्रभाव करते. शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त आज आपण या लेखातून शिवरायांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. (हेही वाचा - Shivrajyabhishek Sohala 2020 Wishes: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Messages, Whatsapp Status, Facebook, Images च्या माध्यमातून देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने निनादून टाका आसमंत सारा)

शिवाजी महाराजांनी प्रतापगड आणि रायगड किल्ले जिंकल्यानंतर रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केले. शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला होता. शिवाजी महाराजांचे दीर्घ आजारामुळे 3 एप्रिल 1680 मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य सांभाळले.