Dhamma Chakra Pravartan Din 2021: धम्मचक्र प्रवर्तन दिन कधी असतो? जाणून घ्या बौद्ध धर्मियांसाठी खास असणार्‍या या सणाविषयी!

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो.

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits-File Images)

बौद्ध धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhamma Chakra Pravartan Din). दरवर्षी भीम अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा आणि विजया दशमी दिवशी साजरा करतात. यंदा दसरा अर्थात विजया दशमी 15 ऑक्टोबरला असल्याने धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 आणि 15 ऑक्टोबरला आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन सेलिब्रेशन साठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यात प्रार्थनास्थळं खुली झाली असली तरीही सामुहिक स्वरूपात धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा सलग दुसर्‍या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमीवर सामुदायिक स्वरूपात साजरा केला जाणार नाही. नक्की वाचा: Dhamma Chakra Pravartan Din 2021: धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचं यंदाही नागपूरच्या दीक्षाभूमीवर आयोजन नाही; जिल्हा प्रशासनाची माहिती.

धम्मचक्र प्रवर्तन दिन महत्त्व

बौद्ध धर्मीयांसाठी 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे कारण हा दिवस अनेकांना बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीचं औचित्य साधत14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही सोबती, अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत 'धम्मचक्र प्रवर्तन' केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो. Dhamma Chakra Pravartan Din Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून द्या शुभेच्छा .

सम्राट अशोका यांनी इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर तारखेला नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत डॉ. आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.

दरम्यान मागील दोन वर्षांपासून कोविड 19 नियमावलीचं पालन करत गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. म्हणूनच मागील वर्षी आणि यंदाच्या वर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या दीक्षाभूमीवर कोणताही कार्यक्रम जनसामान्यांसाठी खुला नसेल. मात्र ऑनलाईन स्वरूपात या कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकतं, भीम अनुयायींना देखील कोविड चे नियम पाळत सुरक्षितपणे हा सण साजरा करण्याचं आवाहन आहे.