Deep Amavasya Wishes: दीप अमावस्येच्या शुभेच्छा मराठमोळी Greetings, Quotes शेअर करत साजरी करा आषाढ अमावस्या
दीप अमावस्या या मंगलमयी दिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, WhatsApp Status, Facebok Messages, Quotes द्वारा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करत श्रावणाची सुरूवात करण्यासाठी ही शुभेच्छापत्रं नकी शेअर करा.
महाराष्ट्रात श्रावण या महिन्याच्या पवित्र महिन्याच्या पूर्वसंध्येला 'दीप अमावस्या' (Deep Amavasya) साजरी करण्याची रीत आहे. आषाढ महिन्यातील अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते.दिवा हे ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या दिवशी दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. मग अशा या मंगलमयी दिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, WhatsApp Status, Facebok Messages, Quotes द्वारा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करत श्रावणाची सुरूवात करण्यासाठी ही शुभेच्छापत्रं नकी शेअर करा.
दीप अमावस्येला अंधारावर प्रकाशाचा विजय आणि येणाऱ्या श्रावण महिन्यातील मंगल कार्यांची नांदी म्हणूनही पाहिले जाते. आषाढ अमावस्येला तिन्ही सांजेच्या वेळी घरातील दिवे प्रज्वलित केले जातात. त्याचे पूजन करण्याची रीत आहे. नक्की वाचा: गटारी, दीप अमावस्या की आषाढ अमावस्या: श्रावण महिना सुरू होण्याआधीचा दिवस नेमका काय?
दीप अमावस्येच्या शुभेच्छा
या दीप अमावस्येला देवी लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्यावर सदैव राहो,
घरात सुख-समृद्धीचा प्रकाश कायम राहो.
शुभ दीप अमावस्या!
पणतीच्या तेजस्वी ज्योतीप्रमाणे तुमचे आयुष्यही
सदैव तेजाने झळाळत राहो.
दीप अमावस्येनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
घरातील प्रत्येक कोपरा प्रकाशाने उजळून निघो,
आणि जीवनातील सर्व संकटे दूर होवोत.
दीप अमावस्येच्या शुभेच्छा!
तमसो मा ज्योतिर्गमय... अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दिवस
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.
दीप अमावस्येच्या शुभेच्छा!
दिव्यांच्या उजेडाने आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर होवो,
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
दीप अमावस्येला काय करतात?
दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे, समया, निरांजने स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. रोजच्या वापरातील दिवे तसेच पूजाघरातील दिवे एकत्र मांडून त्यांना हळद-कुंकू, फुले वाहिली जातात आणि त्यांची आरती केली जाते. दिवा हे ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या दिवशी दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे.