Dokdo Islands: दक्षिण कोरिया-जपान यांच्यातील वादग्रस्त बेटावर एकटीच राहते ८१ वर्षांची महिला
तेही नागरिक म्हणून. गेल्याच वर्षी तिच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतरही ती या बेटाबाहेरच्या लोकवस्तीतर परतली नाही.
दोन देशांमधील वादग्रस्त असलेल्या दोकोदो बेटावर राहणारी एक आजीबाई सर्वांच्या चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरली आहे. वय वर्षे सुमारे 81 असलेल्या या आजिबाईचे नाव किम सिन-योल (Kim Sin-yeol) असे आहे. दक्षिण कोरिया आणि जपान (Japan - Korea dispute) या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमिवर गेली 250 वर्षे मानवी वावर बंद असलेल्या या रिकाम्या बेटावर किम सिन-योल या आजीबाई गेले 28 वर्षे राहात आहेत. विशेष असे की, या संपूर्ण बेटावर ही आजीबाई एकमेव नागरिक आहे. अनेकांनी आग्रह करुनही ही आजीबाई हे बेट सोडायला तयार नाही हे विशेष. दोकोदा बेट (Dokdo Islands) हे अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेचा विषय ठरते.
दोकोदो या बेटावर दक्षिण कोरिया आणि जपान हे दोन्ही देश आपापला हक्क सांगतात. दक्षिण कोरियाचा दावा असा की, 17 व्या शतकापासून हे बेट त्यांचे अभिन्न अंग आहे. तर, जपानही असाच दावा करत असून, हे बेट आपले असल्याचे सांगते. हे बेट तुलनेत दक्षिण कोरियाच्या जवळ असल्याने केवळ पर्यटक येथे पोहोचू शकतात. या बेटावर ज्वालामुखीच्या उद्रेकाची शक्यता अधिक असल्यामुळे पर्यटकही इथे फार काळ थांबत नाहीत. तसेच, दोन देशांचा वाद कायम असल्याने या बेटाचा फारसा विकासही झाला नाही.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम सिन-योल ही आजी 1991 मध्ये आपल्या पतीसोबत पहिल्यांदा या बेटावर आली. हे बेट नैसर्गिक वायू आणि खनिजांनी भरले असले तरीही जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा प्रचंड आभाव असल्यामुळे इथे राहणे या जोडप्यासाठी होते. खराब वातावरणामुळे या बेटाचा नजीकच्या लोकवस्तीशी (शहर) संपर्क अनेक महिन्यांसाठी आजही बंद तूटतो. परंतू, मुक्तपणे दीर्घकाळ पोहण्याचा सराव असल्यामुळे या जोडप्याला इथे राहण्यास अजिबात अडचण आली नाही. किम सिन-योल सांगते की, वर्षातले अनेक आठवडे मी केवळ इथले मासे खाऊन जगते. (हेही वाचा, रोमान्स आणि रोमांच यांचा एकत्र अनुभव देणारी भारतातील बेटं, एकदा जरुर भेट द्या)
अनेक अडचणी आणि संघर्षाचा समना करतही ही आजी गेली अनेक वर्षे या बेटावर एकटीच राहात आहे. तेही नागरिक म्हणून. गेल्याच वर्षी तिच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतरही ती या बेटाबाहेरच्या लोकवस्तीतर परतली नाही. बेटावर गस्त घालणारे पोलीस कर्मचारी आणि लाइटहाउस ऑपरेटरही काही काळ येथे येतात आणि खराब हवामान आणि लहरी निसर्गाचे रुप पाहून काही काळातच परत जातात. परंतू, या सर्वाच या आजीवर काहीच परिणाम होत नाही. वाढत्या वयासमोर हार न मानता आजही ती या बेटावरच मुक्काला असलेली दिसते.
या बेटावर राहायला जाण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. परंतू, हे बेट वादग्रस्त असल्याने स्थानिक प्रशासन इथे राहण्यास कोणालाही अनुमती देत नाही. इथे प्राथमिक गरजांचा अभाव असल्यामुळे इथे फार काळ राहण्यास लोक अनुकुल दिसत नाहीत. अमेरिकी मीडिया चॅनल सीएनएनस ने दिलेल्या वृत्तानुसार या बेटावर केवळ एकाच कुटुंबाला राहता येईल इतकी जागा आहे. त्यामुळे इतरांना या बेटावर राहायला मान्यता दिली जात नाही.