मोठा अपघात! विषारी वायूमुळे टाकी साफ करायला गेलेल्या 6 मजुरांचा मृत्यू

येथील श्रीपेरंबुडूर (Sriperumbudur) रहिवासी क्षेत्रामध्ये विषारी गॅस लीक झाल्याने तब्बल 6 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडू येथे झालेला अपघात (Photo Credit: ANI/PTI)

तामिळनाडू यथे मंगळवारी फार मोठा अपघात झाला. येथील श्रीपेरंबुडूर (Sriperumbudur) रहिवासी क्षेत्रामध्ये विषारी गॅस लीक झाल्याने गुदमरून तब्बल 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इमर्जन्सी सेवा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. एका अपार्टमेंटची दुषित टाकी साफ करण्याचे काम चालू होते त्यावेळी हा विषारी वायू श्वासावाटे शरीरात गेल्याने हा अपघात घडला. पहिल्यांना यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता, मात्र त्यांना वाचवायला इतर दोन लोक गेले आणि त्यांचाही मृत्यू झाला. ( हेही वाचा: भीषण अपघात: मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावर बस दरीत कोसळून 4 जणांचा मृत्यू, 45 लोक जखमी)

यातील तीन लोक हे एकाच कुटुंबातील आहेत. यांचे पार्थिव बाहेर काढून ते शव विच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहे. पुरेश्या सुरक्षा गॅझेटच्या कमतरतेमुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून घेतला असून याबाबत अधिक तपास चालू आहे.



संबंधित बातम्या

Chennai: कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर गुदमरला श्वास, उपचाराआधीच अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

मोठा अपघात! विषारी वायूमुळे टाकी साफ करायला गेलेल्या 6 मजुरांचा मृत्यू

Hair Lss Reversing Medicine: टक्कल आणि केस गळतीवर 20 रुपयांमध्ये रामबाण औषध? यूपीच्या मेरठमध्ये दोन तरुणांचा दावा, तेल घेण्यासाठी जमली तोबा गर्दी (Video)

Superstition: पितृत्व प्राप्त करण्यासाठी जिवंत कोंबडीचे पिल्लू गिळले, तरूणाचा मृत्यू; छत्तीसगडमधून अंधश्रद्धेची धक्कादायक घटना समोर

Maharashtra Forts: गड-किल्ल्यांवर गैरकृत्य, मद्यप्राशन केल्यास खैर नाही; शिक्षेसह 1 लाखांचा दंडही भरावा लागणार

ST Bus: दिवाळीत 'लालपरी'च्या कमाईत मोठी वाढ; दिवसाला 60 लाख प्रवासी वाहतूक, 31 कोटींची कमाई