Uneven Monsoon Rains in India: भारतात मान्सून पाऊस असमान, देशातील 25% प्रदेश अद्यापही कोरडाच; स्थानिकांना येईना हवामान अंदाज

या प्रदेशांमध्ये पाऊस समाधानकारक झाला नाही. परिणामी या ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे. भारतातील 36 हवामानशास्त्रीय उपविभागांपैकी 25% भागात पावसाला मध्यावर आला तरीसुद्धा पावसाची कमतरता जाणवत आहे.

Uneven Monsoon India | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून (Monsoon) यंदा देशभरात दमदार बरसत असल्याचे चित्र रंगवले जात आहे. कुठे मुसळधार पाऊस (Heavy Rain), कुठे भूस्खलन तर काही ठिकाणी पूर, महापूर आणि पूरसदृश्य स्थिती दर्शवणाऱ्या बातम्या प्रसारमाध्यमांतून पाहिल्या, तर ते खरेही वाटावे. पण, प्रत्यक्षात चित्र काहीसे विरोधाभासात्मक आहे. आजही भारतातील पर्जन्यमानात असमानता (Uneven Monsoon India) असून, जवळपास 25% प्रदेश कोरडाच आहे. या प्रदेशांमध्ये पाऊस समाधानकारक झाला नाही. परिणामी या ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे. भारतातील 36 हवामानशास्त्रीय उपविभागांपैकी 25% भागात पावसाला मध्यावर आला तरीसुद्धा पावसाची कमतरता जाणवत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) हवामान अंदाज वर्तवताना वेळोवेळी दिलेल्या  आकडेवारीनुसार, भारतात जुलैमध्ये नेहमीच्या 280.5 मिमीच्या तुलनेत 306.6 मिमी पाऊस पडला. जो सरासरीपेक्षा 9% जास्त आहे. मान्सून सुरु झाल्यापासून म्हणजेच, 1 जूनपासून, संचयी पर्जन्यमान 453.8 मिमी आहे, जे सामान्य 445.8 मिमीपेक्षा 2% जास्त आहे. IMD  ने म्हटले आहे की, असे असले तरी पर्जन्यवृष्टीमध्ये कमालीची असमानता आहे.  काही ठिकाणी पाऊस अतिमुसळधार तर काही ठिकाणी अगदीच नगन्य पडला आहे.  (हेही वाचा, Monsoon In India 2024 Update : भारतामध्ये जुलै महिन्यात 9% अधिक पाऊस; मध्य भागात 33% अधिक बरसला- IMD ची माहिती)

पावसाची प्रादेशिक तफावत

पावसाची तूट असलेले प्रदेश

अधिक पाऊस असलेले क्षेत्र:

 

IMD अंदाज आणि हवामान प्रभाव

IMD ने ईशान्य भारतातील अनेक भाग आणि वायव्य, पूर्व आणि आग्नेय द्वीपकल्पीय भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विभागाला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि पश्चिम हिमालयाच्या पायथ्याशी सरासरीपेक्षा जास्त पावसाची अपेक्षा आहे. तथापि, भारतीय मान्सून विविध नैसर्गिक घटकांमुळे जन्मजात चढउतार आणि बदलांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. ही घटना नैसर्गिक परिवर्तनशीलता म्हणून ओळखली जाते. संशोधन असे दर्शविते की हवामानातील बदलामुळे मान्सून अधिक परिवर्तनशील होत आहे. हवामानात होणारे बदल अधिक तीव्र आहेत. काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी अत्यल्प पाऊस पाहायला मिळतो.

शेतीसाठी मान्सूनचे महत्त्व

भारताच्या कृषी क्षेत्रासाठी मान्सून महत्त्वपूर्ण आहे. देशातील 52% निव्वळ लागवड क्षेत्र त्यावर अवलंबून आहे. देशभरात पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेले जलाशय भरून निघणे देखील महत्त्वाचे आहे. जून आणि जुलै हे विशेष महत्त्वाचे आहेत कारण खरीप पिकाच्या बहुतांश पेरण्या याच काळात होतात. त्यामुळे भारात पावसाची स्थिती चांगली असणे महत्त्वाचे असते. दरम्यान, हवामान संस्थांना ऑगस्टपर्यंत ला नीना परिस्थिती निर्माण होण्याची अपेक्षा आहे, जी भारतीय उपखंडात पावसाळ्यात दमदार पावसाची आपेक्षा करते.