Digital Arrest Scam: तोतया CBI अधिकाऱ्यांकडून महिलेची तब्बल 5.5 कोटी रुपयांची फसवणूक; डिजिटल अटक घोटाळ्याची बळी

फसवणूक करणाऱ्यांनी स्वत:ला सीबीआय अधिकारी सादर केले. TGCSB द्वारे सुरू असलेला तपास आणि प्रकरण घ्या जाणून.

Digital Arrest | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Telangana News: हैदराबाद (Hyderabad) येथील एक 67 वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुलींना टप्प्याटप्प्याने तब्बल 17 दिवस 'डिजिटल अटक' (Digital Arrest) करण्यात आली. त्यांच्यावर दबाव टाकत त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. ज्यातून त्यांची तब्बल 5.5 कोटी रुपयांची फसवणूक (Financial Fraud) झाली. आरोपींनी या मायलेकींना आपण राष्ट्रीय संस्थांचे अधिकारी ( Fake CBI Officers,) असल्याचे भासवले. या तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी या कुटुंबाची फसवणूक करताना कुटुंबावर 24 तास व्हिडिओ आणि ऑडिओ द्वारे पाळत ठेवली. या प्रकरणात तेलंगणा सायबर सिक्युरिटी ब्युरोने (TGCSB) एफआयआर नोंदवला आहे आणि या व्यापक मोहिमेचा घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे.

TRAI कडून पीडितेला कॉल

हैदराबाद येथील बशीरबाग येथील रहिवासी भारतीबाई अग्रवाल यांना 13 नोव्हेंबर रोजी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (TRAI) राहुल कुमार म्हणून ओळख सांगणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने भारतीबाई यांचा आधारशी जोडलेला फोन नंबर मनी लॉन्ड्रिंग आणि अंमली पदार्थांच्या प्रकरणांशी जोडलेला असल्याचा दावा केला. पुढे याच फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने हा कॉल सौरव शर्मा आणि अजय गुप्ता या दोन सीबीआय अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केला. या कॉलनंतरच फसवणुकीच्या या प्रकरणाची सुरुवात झाली. (हेही वाचा, Digital Arrest Scam: डिजिटल अटक घोटाळे रोखण्यासाठी सरकारने उचलली कडक पाऊलं, जाणून घ्या, अधिक माहिती)

डिजिटल अटक घोटाळा नेमका घडला कसा?

आरोपींनी भारतीबाई अग्रवाल यांना भारतीला स्काइपवर त्यांच्याशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले. त्या स्काईपवर येताच तिला आणि तिच्या मुलींना 'डिजिटल अटक' करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी कुटुंबाला धमकावण्यासाठी, हातकडी घातलेल्या व्यक्तींच्या बनावट फुटेजसह, सीबीआय आणि आरबीआयचे लोगो असलेल्या बनावट कागदपत्रांचा वापर केला. मुलींना केवळ त्यांच्या परीक्षेसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी होती आणि परतल्यावर लगेचच स्काइपवर पुन्हा संपर्क साधणे आवश्यक होते. (हेही वाचा, Mumbai Digital Arrest Scam: मुंबईमध्ये 'डिजिटल अटक' प्रकरण; महिलेस 3.8 कोटीस गंडा; एक महिन्याहून अधिक काळ आर्थिक शोषण)

सक्तीचे आर्थिक हस्तांतरण

आरोपींकडून सततच्या देखरेखीखाली ठेवलेल्या भारती यांना अनेक व्यवहारांमध्ये 5.5 कोटी रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले गेले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बँक अधिकाऱ्यांनी मोठ्या व्यवहारांबद्दल विचारले असता, फसवणूक करणाऱ्यांनी तिला मालमत्ता खरेदी किंवा धर्मादाय देणग्या यासारखी बनावट कारणे देण्यास सांगितले. (हेही वाचा, Digital Arrest: डिजिटल फसवणूक आणि सायबर फ्रॉडवर मोठी कारवाई, गृह मंत्रालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन)

भारती अग्रवाल यांनी पैसे परत मिळविण्यासाठी सुलतान बाजार येथील सीबीआय कार्यालयाशी संपर्क साधला. तेथे त्यांना कळले की, हा सर्व प्रकार म्हणजे केवळ कागदपत्रे बनावट असल्याचे आणि ही कारवाई एक घोटाळा होता. त्यानंतर पीडितेने टीजीसीएसबीकडे तक्रार दाखल केली. तेलंगणा पोलिसांनी ज्याने आयटी कायदा, 2008 च्या कलम 66 डी आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि बँकिंग कायद्यांच्या संबंधित तरतुदींखाली एफआयआर नोंदवला.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणारे निरीक्षक आर. वेंकटेश यांना राष्ट्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांची वेशभूषा करणाऱ्या संघटित गटाचा सहभाग असल्याचा संशय आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस पैशाच्या मागावर आहेत. अधिकाऱ्यांनी जनतेला सावध राहण्याचे आणि सरकारी अधिकारी असल्याचे भासवून व्यक्तींनी केलेल्या कोणत्याही दाव्यांची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. अशाच प्रकारच्या घोटाळ्यांना बळी पडण्यापासून रोखण्यासाठी धोके ओळखणे आणि संशयास्पद हालचालींचा त्वरित अहवाल देण्याच्या महत्त्वावर सायबर सुरक्षा तज्ञांनी भर दिला आहे.