TamilNadu: देशी बॉम्ब तोंडात फुटला, हत्तीचा उपासमारीने मृत्यू

थडागाम वन परिक्षेत्रातील स्थानिकांनी वन अधिकार्‍यांना एक कमजोर हत्ती वीटभट्टीजवळ फिरत असल्याची सूचना केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर इथे एका हत्तीचा उपासमारीने मृत्यू झाला आहे.  काही दिवसापुर्वी या हत्तीच्या तोंडात बंदी घातलेला देशी बॉम्बचा स्फोट झाला होता. या घटनेनंतर ती हत्तीनी काहीही खाण्यास असमर्थ होती.  रान डुकरांना शेतात जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी स्थानिक लोकांकडून अवुत्तुकाई नावाने ओळखला जाणारा हा बॉम्ब सामान्यत: फळ किंवा भाजीमध्ये लपवून ठेवला जातो. जेव्हा एखादा प्राणी अवुत्तुकाईला चावतो तेव्हा त्याचा स्फोट होतो, ज्यामुळे प्राण्याच्या तोंडाला गंभीर इजा होते.  (हेही वाचा - Sonia Gandhi यांचे थेट PM Narendra Modi यांना पत्र, संसदेच्या विशेष अधिवशनात 9 मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी)

थडागाम वन परिक्षेत्रातील स्थानिकांनी वन अधिकार्‍यांना एक कमजोर हत्ती वीटभट्टीजवळ फिरत असल्याची सूचना केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. वरिष्ठ अधिकारी आणि पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अस्वस्थ हत्तीला अंतस्नायु औषध आणि ग्लुकोज (IV) दिले. पशुवैद्यकीय पथकाने ओळखले की हत्तीने 'अवतुकाई' नावाच्या देशी बॉम्बमध्ये चावला होता, ज्यावर बंदी आहे.

सूत्रांनी सांगितले की, हत्ती अलीकडेच केरळमधून तामिळनाडूच्या जंगलात दाखल झाला होता. हत्तीचा अवुत्तुकाईचा सामना कुठे झाला हे शोधण्यासाठी अधिकारी चौकशी सुरू करणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement