Tamil Nadu: सीबीआय कस्टडी मधील 103 किलो सोने गायब; किंमत तब्बल 45 कोटी
सीबीआय ने जप्त केलेले 103 किलोग्रॅमहून अधिक सोने गायब झाले आहे. या सोन्याची किंमत 45 कोटीच्या सुमारास आहे.
तामिळनाडू (Tamil Nadu) मधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीबीआय (CBI) ने जप्त केलेले 103 किलोग्रॅमहून अधिक सोने गायब झाले आहे. या सोन्याची (Gold) किंमत 45 कोटीच्या सुमारास आहे. सीबाआयच्या सेफ कस्टडी मध्ये हे सोने ठेवण्यात आले होते. तरी देखील सोने गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मद्रास हायकोर्टाने तामिळनाडू सीबी-सीआयडी (CB-CID) ला या प्रकरणी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. रिपोर्टनुसार, 2012 मध्ये चेन्नईच्या सुराना कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ऑफिसमधून सीबीआयच्या टीमने छापेमारी केली. त्यात 400.5 किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले. यात सोन्यांच्या विटांपासून ज्वेलरीचा देखील समावेश होता. त्यानंतर सोने सीबीआय कस्टडीमध्ये ठेवण्यात आले होते. (Delhi Gold Smuggling Case: दिल्ली येथील 83 किलो सोने तस्करी प्रकरणाचे सांगली कनेक्शन, NIA पथकाकडून आटपाडी, खानापूर येथे काही जणांची चौकशी)
रिपोर्टनुसार, सर्व सोने सील करुन सीबीआयच्या सेफ कस्टडीमध्ये ठेवल्यानंतर चेन्नईच्या प्रिसिंपल स्पेशल कोर्टाला सेफ आणि वॉल्ट्स च्या 72 चाव्या सुपूर्त करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या सोन्याची नोंद असलेली कागदपत्रं देखील गहाळ झाली आहेत. या सर्व प्रकारानंतर सीबीआयने स्पष्टीकरण देताना म्हटले की, सोने जप्त करण्यात आले होते तेव्हा त्याचे एकत्रितपणे वजन केले होते. (पुणे विमानतळावर दुबई हून आलेल्या प्रवाशाकडून तब्बल 7.89 रुपयांचे सोने जप्त; खोडरबरमध्ये सोने लपवून तस्करीचा प्रयत्न)
एसबीआय आणि सुरानामध्ये कर्जाचे विस्तारण करण्याची बैठक पार पडली तेव्हा लिक्विडेटर सुपूर्त करताना सोन्याचे वेगवेगळे वजन करण्यात आले होते, अशी माहिती एसबीआयने दिली. या कारणामुळेच सोन्याच्या वजनामध्ये तफावत दिसून येत आहे. सध्या या घटनेची सविस्तर चौकशी करण्यासाठी ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे आणि लवकरच त्याची चौकशी सुरु होईल. त्यानंतर प्रकरणातील सत्याचा उलघडा होईल, अशी आशा आहे.