पुणे विमानतळावर दुबई हून आलेल्या प्रवाशाकडून तब्बल 7.89 रुपयांचे सोने जप्त; खोडरबरमध्ये सोने लपवून तस्करीचा प्रयत्न
पुणे विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी 151.82 ग्रॅम सोने जप्त केले आहे. 29 ऑक्टोबर रोजी दुबई हून आलेल्या प्रवाशाकडून हे सोने जप्त करण्यात आले असून या सोन्याची किंमत तब्बल 7.89 लाख इतकी आहे.
पुणे विमानतळावर (Pune Airport) कस्टम अधिकाऱ्यांनी (Custom Officials) 151.82 ग्रॅम सोने जप्त केले आहे. काल, 29 ऑक्टोबर रोजी दुबई (Dubai) हून आलेल्या प्रवाशाकडून हे सोने जप्त करण्यात आले असून या सोन्याची किंमत तब्बल 7.89 लाख इतकी आहे. सोने खोडरबरमध्ये (Rubber Erasers) लपवून तो रबर बॅगेच्या हँडलमध्ये लपवण्यात आला होता. हे 24 कॅरेट सोने आहे. विमातळावरील तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
पुण्यात तस्करीच्या घटना वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी कस्टम विभागातील अधिकाऱ्यांनी तब्बल 1 कोटी 29 लाख 4 हजार रुपयांचे सोने जप्त केले होते. त्यावेळेस एक ग्रुप सोन्याची तस्करी करत असल्याचे तपासादरम्यान आढळून आले होते. त्यांनी विमानाच्या वॉशरुममध्ये सोने लपवले होते. (पुणे कस्टम विभागातील अधिकाऱ्यांकडून चरस, गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक; तब्बल 1.79 कोटींचा माल जप्त)
ANI Tweet:
Maharashtra: Custom officials at Pune Airport seized 151.82 g of gold valued at Rs 7.89 lakhs from a passenger from Dubai on 29th Oct. The gold was concealed in rubber erasers & hidden under handle of a bag. Further investigation underway. pic.twitter.com/kRt436ps7t
— ANI (@ANI) October 30, 2020
सोन्यासह अंमली पदार्थांची तस्करी होण्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. जून महिन्यात चरस आणि गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल 1.04 कोटी तर चरसची किंमत 75 लाख इतकी होती.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी दिल्ली रेल्वे स्थानकावरुन जप्त करण्यात आलेल्या 83 किलो सोने प्रकरणाचा महाराष्ट्राशी संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. सांगली मधील खानापूर आणि आटपाडी येथील काही लोकांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2020 09:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

