Nipah Virus Outbreak in Kerala: केरळमध्ये निपाह व्हायरसचे संकट अद्याप कायम; मलप्पुरममध्ये 14 वर्षांच्या मुलाची चाचणी सकारात्मक
मलप्पुरममध्ये 14 वर्षांच्या मुलाची निपाह संसर्गाची चाचणी सकारात्मक आली आहे.
Nipah Virus Outbreak in Kerala: केरळच्या(Kerala)मलप्पुरममध्ये एका 14 वर्षांच्या मुलाची निपाह व्हायरसची (Nipah Virus) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री(Kerala Health Minister) वीणा जॉर्ज यांनी शनिवारी दिली. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, "एनआयव्ही पुणे येथे 14 वर्षीय मुलाचा संशयित केस निपाह पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली आहे. मुलांची संपर्क यादी तयार केली जाईल आणि उच्च जोखमीच्या श्रेणीतील व्यक्तींचे नमुने पाठवले जातील. चाचणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांसोबत एक बैठक आयोजित केली जाईल जेणेकरुन केंद्राच्या 3 किमीच्या परिघात लादल्या जाणाऱ्या निर्बंधांवर चर्चा केली जाईल. (हेही वाचा: Kerala Nipah Virus Scare: कोविड-19 च्या तुलनेत निपाह व्हायरसचा मृत्यूदर 70% अधिक, ICMR ची माहिती)
यापूर्वी, वीणा जॉर्ज यांनी शनिवारी मलप्पुरम जिल्ह्यात 'निपाह' विषाणूच्या संशयास्पद प्रकरणाच्या अहवालानंतर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जनतेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. अधिका-यांनी सद्यस्थिती आणि उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी आतापर्यंत उचललेल्या पावलांचाही आढावा घेतला.
केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. केरळमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निपाहचे सहा रुग्ण समोर आले होते. विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे डोस मागवण्यात आले होते. निपाहच्या संसर्गाने अनेकांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: Nipah Virus Outbreak: केरळात निपाह व्हायरसचा कहर; शैक्षणिक संस्था 24 सप्टेंबरपर्यंत बंद)
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) द्वारा देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा विषाणू COVID-19 पेक्षाही गंभीर आहे. कारण कोणाच्या तुनेलत याचा मृत्यूदर अधिक आहे. ICMR डीजी डॉ राजीव बहल यांनी माहिती देताना शुक्रवारी सांगितले की, निपाहचा मृत्यू दर कोविडच्या तुलनेत सुमारे 60% अधिक असल्याचे त्यांच्या पाहणी अहवालात पुढे आले आहे. महामारीच्या काळात कोविड-19 संसर्गामुळे होणारा मृत्यूदर अवघा 03% इतका होता.
कोविडच्या तुलनेत निपाह संक्रमित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असून ते 40 ते 70 टक्के दरम्यान असल्याचेही आयसीएमआरने म्हटले आहे. जे आगोदर 2-3 टक्के इतके होते. आयसीएमआरने माहिती देताना म्हटले आहे की, त्यांना ऑस्ट्रेलियाकडून सन 2018 मध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीचे काही डोस मिळाले. सध्या हे डोस फक्त 10 रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर, भारताबाहेर निपाह विषाणूची लागण झालेल्या 14 रुग्णांना मोनोक्लोनल अँटीबॉडी देण्यात आली आहे. अँटीबॉडी देण्यात आलेले ते सर्वजण सुरक्षीत आहेत.