Kerala Second Mpox Case: केरळमध्ये 'एमपॉक्स' संक्रमित दुसऱ्या रुग्णाची पुष्टी, UAE मधून परतलेल्या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह

प्रतिबंधात्मक उपाय सुरू आहेत, आरोग्य विभाग Monkeypox विषाणूच्या प्रसारावर लक्ष ठेवत आहे.

Mpox India | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केरळ सरकाने एमपॉक्स (Mpox) रुग्णाची अधिकृतरित्या पुष्टी केली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) अलीकडेच परतलेल्या एका व्यक्तीला एमपॉक्स (पूर्वी मंकीपॉक्स (Monkeypox) म्हणून ओळखला जाणारा) विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्याला एर्नाकुलम येथे खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत राज्यात आढळळेला हा हा दुसरा रुग्ण (Kerala Second Mpox Case) असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनीही या प्रकरणाची पुष्टी केली आणि प्रतिबंधात्मक उपायांची त्वरित अंमलबजावणी करण्यात आल्याचे जाहीर केले.

विलगीकरण सुविधा निर्मितीस सुरुवात

वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाकडून रुग्णाची संपर्क यादी तयार करण्यात आली असून मंकीपॉक्सचे संभाव्य संक्रमण टाळण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच, एक समन्वित आरोग्य प्रतिसाद सुनिश्चित करून, संभाव्य प्रकरणांचा सामना करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये विलगीकरण सुविधा स्थापन करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा, What is Mpox? एमपॉक्स म्हणजे काय? लक्षणे, सद्यस्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाय घ्या जाणून)

केरळमधील एमपॉक्सचे पहिले प्रकरण

केरळमध्ये पहिल्या 23 सप्टेंबर रोजी एमपॉक्स संसर्गाची नोंद झाली. त्यानंतर काहीच दिवसांनी हे ताजे प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये दुसऱ्या रुग्णाची अधिकृत पुष्टी झाली आहे. सुरुवातीच्या प्रकरणात मलप्पुरम येथील 38 वर्षीय व्यक्तीचा समावेश होता, जो देखील संयुक्त अरब अमिरातीमधून परतला होता. ज्याला विषाणूच्या क्लेड 1 बी स्ट्रेनची लागण झाली होती. (हेही वाचा, Monkeypox: मंकीपॉक्स आजाराचं नाव बदललं, जागतिक आरोग्य संघटनेकडून नव्या नावाची घोषणा)

एमपॉक्सचा प्रसार आणि सरकारी सल्ला

देशात आढळलेल्या काही एम्पॉक्स रुग्णांची पुष्टी होताच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सल्ला जारी केला आहे. ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य सज्जतेचे मूल्यांकन करण्याचे आणि कोणत्याही एमपॉक्स प्रकरणांना हाताळण्यासाठी आरोग्य सुविधा सुसज्ज आहेत याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे. पुढील प्रादुर्भावाचा धोका कमी करण्यासाठी राज्य आणि जिल्हा अशा दोन्ही स्तरांवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा नियमित आढावा घेण्याच्या गरजेवर मंत्रालयाने भर दिला.

एमपॉक्स कसा पसरतो?

एमपॉक्स प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीशी दीर्घकाळ आणि जवळच्या संपर्कातून पसरतो. हा विषाणू ताप, पुरळ आणि सुजलेल्या लसीका ग्रंथी यासारख्या लक्षणांसह प्रकट होतो आणि त्वरित उपचार न केल्यास गुंतागुंत निर्माण करतो. संसर्ग सामान्यतः दोन ते चार आठवड्यांदरम्यान टिकतो, बहुतेक रुग्ण काळजी औषधोपचार घेऊन बरे होतात.

डब्ल्यूएचओच्या 2022 च्या घोषणेपासून, भारतात देशभरात आतापर्यंत एमपॉक्सची 30 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विषाणूचा पुढील प्रसार रोखण्यासाठी लवकर निदान, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करून आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या, केरळचे आरोग्य अधिकारी सतर्क आहेत आणि बाधितांना शक्य तितकी सर्वोत्तम काळजी मिळेल याची खात्री करून घेत राज्याने विषाणूला आळा घालण्यासाठी आपले प्रयत्न त्यांनी सुरु ठेवले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif