भारतीय रेल्वे ट्रॅकमॅनच्या सोबतीला GPS यंत्रणा, अपघात 70% आटोक्यात ठेवण्यात रेल्वेला यश देतोय 'हा' प्रयोग
अपघाताचा धोका वेळीच संबंधित कार्यालयापर्यंत पोहचवण्यासाठी आता रेल्वेने त्यांच्या ट्रॅकमॅनला जीपीएस (GPS) यंत्रणेसोबत जोडले आहे.
आज देशातल्या गावागावांना जोडण्यासाठी रेल्वे सेवा (Indian Railway) एक प्रमुख भूमिका निभावत आहे. प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा याकरिता जीव धोक्यात टाकून काम करणारी एक व्यक्ती म्हणजे ट्रॅकमॅन (TrackMan). अपघाताचा धोका वेळीच संबंधित कार्यालयापर्यंत पोहचवण्यासाठी आता रेल्वेने त्यांच्या ट्रॅकमॅनला जीपीएस (GPS) यंत्रणेसोबत जोडले आहे. त्यामुळे अनेक गोष्टींचा धोका वेळीच ओळखणं सुकर झालं आहे. मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्यांना खास गिफ्ट! 12 ते 25 हजार रूपयांची होणार पगारवाढ
कसे करणार काम ?
- ट्रॅकमॅन दिवसरात्र काम करत आहेत. जीपीएस ट्रॅकर सुरूवातीला काही भागात प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात आले होते. रेल्वे अपघात रोखण्यासाठी त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचं दिसून आल्यानंतर सर्वत्र त्याचा वापर केला जाणार आहे.
- जीपीएस ट्रॅकर द्वारा जर काही धोका असेल तर ट्रॅकमॅन लाल बटण दाबेल. त्यामुळे तात्काळ कंट्रोल रूमला एक संदेश जाईल. पुढील मिनिटाभरात एका एसएमएसद्वारा कंट्रोलरूम, स्टेशनमास्तर, ट्रॅकवर येणार्या ट्रेनच्या चालकाला त्याची माहिती मिळते.
- एसएमएसप्रमाणेच जीपीएस डिव्हाईसच्या माध्यमातून कॉलद्वाराही माहिती पोहचवण्याची सुविधा आहे.
-
ट्रॅकमॅन नेमका कुठे आहे? कुठापर्यंत पोहचून त्याने काम केलं आहे याची माहिती मिळावी यासाठी ही जीपीएस ट्रॅकिंग सुविधा फार मोलाची कामगिरी करत आहे. 'जर बिल मिळालं नाही तर तुमचं जेवण फुकट’. रेल्वेची कॅटरिंग सेवा पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचा निर्णय
रेल्वेने केलेल्या दाव्यानुसार या नव्या आणि सुसज्ज यंत्रणेमुळे सुमारे 70% अपघात रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात भारतीयांचा प्रवास अधिक सुपरफास्ट होणार आहे मात्र त्यासोबतच तो अधिक सुरक्षितही होईल असा रेल्वेचा विश्वास आहे.