COVID19: संसद भवनातील 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 6-7 जानेवारी दरम्यान झाली होती चाचणी

असे सांगितले जात आहे की, 6-7 जानेवारी दरम्यान सर्वांची कोरोनाची चाचणी करण्यात आली.

Parliament (Photo Credits: PTI)

COVID19: संसद भवनात कोरोनाचा विस्फोट झाला असून 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहेत. असे सांगितले जात आहे की, 6-7 जानेवारी दरम्यान सर्वांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. देशात ज्या प्रकारे कोरोनाचे रुग्ण आढळून येत त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर दिवसागणिक कोरोनाचे हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत.(Assembly Election 2022: कोरोनादरम्यान पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या डिजिटल, जाणून घ्या निवडणूक आयोगाची खास तयारी)

काही राज्यातील मंत्री आणि नेत्यांना ओमिक्रॉनचे संक्रमण झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून 200 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. भारतातील 27 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे एकूण 3 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचे सातत्याने रुग्ण आढळत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असे म्हटले की, संपूर्ण जगात ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. त्यामुळे देशाच्या विविध ठिकाणाहून महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या सर्व व्यक्तींना 7 दिवस क्वारंटाइन राहणे अनिवार्य असणार आहे. एका स्पेशल अॅपच्या माध्यमातून याबद्दल मॉनिटर केले जाणार आहे.(First Omicron Death in India: भारतामध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू; केंद्र सरकारने केली पुष्टी)

दरम्यान, देशातील विविध राज्यांनी सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुरु झालेल्या शाळा, महाविद्याले, सिनेमागृहांसह अन्य सार्वजनिक ठिकाणांवर सुद्धा आता नवे नियम लागू केले जाणार आहेत. परंतु नागरिकांनी सुद्धा कोरोनाचे नियम पालन करावे असे वारंवार आवाहन केले जात आहे.