IPL Auction 2025 Live

Coronavirus Vaccine: Pfizer च्या कोरोना व्हायरस लसीला -70 डिग्री तापमानावर ठेवणे आवश्यक; भारतासाठी एक नवे आव्हान- AIIMS Chief Randeep Guleria

अजूनही अनेक देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. आता सर्व देश लवकरच या साथीच्या आजारापासून मुक्त होण्याची अशा करीत आहेत.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतासह जगभरातील देश सध्या कोरोना विषाणूची (Coronavirus) लढत आहेत. अजूनही अनेक देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. आता सर्व देश लवकरच या साथीच्या आजारापासून मुक्त होण्याची अशा करीत आहेत. या दृष्टीने जगासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे लवकरच कोरोना लस (Coronavirus Vaccine) येत आहे. परंतु आता भारतासमोर ती साठवणुकीची समस्या हे एक मोठे आव्हान आहे. अमेरिकन औषध कंपनी Pfizer कोरोना विषाणूच्या लसीची यशस्वी चाचणी घेतली आहे. फायनल क्लिनिकल चाचणीत ही लस 90% प्रभावी असल्याचे आढळले आहे.

परंतु भारतासमोर ही लस साठवायची कशी ही समस्या आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) दिल्लीचे संचालक रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) म्हणाले की, फायझरची लस अत्यंत कमी तापमानात ठेवावी लागेल जे भारतासारख्या देशांसाठी एक आव्हान आहे. गुलेरिया यांनी बुधवारी सांगितले की, Pfizer च्या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निकाल खूप उत्साहवर्धक आहे परंतु ती -70 डिग्री सेल्सियस इतक्या कमी तापमानात ठेवणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Pfizer COVID-19 Vaccine: कोविड 19 वरील लस कधी येणार? जाणून घ्या अमेरिकेच्या Pfizer Inc आणि BioNTech SE कंपनीच्या लसीबद्दल खास गोष्टी)

कोल्ड चेन कायम ठेवणे हे कमी आणि मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांसाठी विशेषतः लहान शहरे आणि खेड्यांमध्ये एक आव्हान असेल. या लसीमध्ये बरीच क्षमता आहे, परंतु येणाऱ्या इतर लसींकडे पाहण्याची गरज आहे. फेज-3 चाचण्यांमध्ये सर्व संभाव्य लसांबद्दल निकाल समाधानकारक आहेत.

एम्सचे संचालक म्हणाले की, Pfizer च्या दाव्यांचा तज्ञांकडून परीक्षण होणे आवश्यक असले तरी, त्यासंबंधित घोषणा ही इतर लसी बनविण्याच्या दृष्टीने खूपच आशादायक चिन्ह आहे. Pfizer ने जाहीर केलेल्या आकडेवारीचा तज्ञांकडून अद्याप आढावा घेतला गेलेला नाही, परंतु तो डेटा खूपच उत्साहवर्धक आहे. फेज-3 चाचण्यांमध्ये 40 हजाराहून अधिक रुग्णांना ही लस देण्यात आली व ती 90 टक्के यशस्वी ठरली आहे.